Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जिवलग मैत्रिणीच्या मृत्यनंतर 2 महिन्यानंतर 'तिच्या'सह घडली भयानक घटना; जिथे वडिल काम करायचे तिथेच...

दोन महिन्यांच्या अंतराने दोन जीवलग मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे. मृत मैत्रिण बोलवत असल्याचा भास होत असल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. 

जिवलग मैत्रिणीच्या मृत्यनंतर 2 महिन्यानंतर 'तिच्या'सह घडली भयानक घटना; जिथे वडिल काम करायचे तिथेच...

Nagpur Crime News : जिवलग मैत्रिणीच्या मृत्यनंतर 2 महिन्यानंतर एका मैत्रिणीचा देखील मृत्यू झाला आहे. मैत्रिण जाण्याच्या विरहातून एका तरुणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. दोन जीवलग मैत्रिणींचा दोन महिन्यांच्या अंतराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे (Nagpur Crime News).  

जिवलग मैत्रीण गेल्याच दुःख विसरू न शकल्याने ही तरुणी तणावात होती. याच तणावातून तिने स्वतः पाण्याच्या टाक्यात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियंका सराटे ( वय 22 वर्षे) असं या तरूणीचे नाव आहे. ती नंदनवन भागातील संताजी नगर परिसरात राहत होती.

प्रियंका 13 जूनला अचानक घरातून निघून गेली. सर्वत्र शोधा शोध करूनही ती सापडली नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली. दोन दिवसांनी तिच्या घरालगत असलेल्या चिराग आईस फॅक्टरीच्या आत असलेल्या पाण्याच्या टाकीत प्रियंकाचा मृतदेह दिसून आला. याच फॅक्टरीमध्ये प्रियंकाचे वडील काम करतात. यामुळे तात्काळ तिच्या मृतदेहाची ओळख पटली.

पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मृत प्रियंका ही नंदनवन परिसरात एका कॅफेत तिच्या मैत्रीणीसोबत काम करत होती. दोन महिन्यांपूर्वी तिच्या मैत्रिणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तेव्हापासून प्रियंका सातत्याने तणावात राहत होती. मृतक मैत्रीण प्रियंकाला बोलवत आहे असा भास होत असल्याचं ती कुटुंबियांना सांगत होती. मैत्रिणीचा विरह सहन होत नसल्यानं दुःख आणि नैराश्याने प्रियंकाला ग्रासलं होतं. यातूनच प्रियंकाने आत्महत्या केल्याच समोर आले आहे आहे. 

फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटले 

मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला दोघांनी दगडाने बेदम मारहाण करत लुटले. नांदेड शहरात घडलेली ही घटना सीसीटिव्ही कॅमेर-यात कैद झाली. गणेशनगर रस्त्याच्या फुटपाथवर एक व्यक्ती झोपला होता. दोघे तरुण तिथे आले आणि त्यांनी त्या झोपलेल्या व्यक्तिकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले. त्या दोघांनी दगडाने झोपलेल्या व्यक्तीला मारहाण केली. ओरडण्याचा आवाज एकूण एक व्यक्ती धावून आल्यानंतर मारहाण करणारे दोघे पळून गेले. सीसीटिव्ही फुटेज च्या आधारे पोलीस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

 

Read More