Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक...पाहा काय आहे हे सत्य

 एक धक्कादायक बातमी. कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यावर नाशिकमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीराला चुंबकत्व निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. 

लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक...पाहा काय आहे हे सत्य

योगेश खरे / नाशिक : एक धक्कादायक बातमी. कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यावर नाशिकमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीराला चुंबकत्व निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. नाशिकच्या सिडको भागातला हा प्रकार आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. 

सिडको परिसरात शिवाजी चौकात राहणारे 71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांना हा अनुभव येतोय. कुठल्याही धातूच्या वस्तू थेट शरीरावर चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर झी 24तासने तातडीने याचा मागोवा घेत यात फसवेगिरी नाही ना याचा शोध घेतला. 'झी 24तास'चे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी तातडीने अरविंद सोनार यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या घरी जाऊन हा प्रकार तातडीने तपासला. 

'झी २४ तास'च्या कॅमेरासमोर सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून दाखवल्या. दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यानंतर लस घेतल्यावर समाज माध्यमात चुंबकत्व निर्माण होते असे समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला.  तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले. या संदर्भात तपासणी करूनच प्रतिक्रिया देऊ असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

Read More