Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडे

अवघ्या देशवासियांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या नागपूरातील ग्रीन बसचे भविष्य काहीसे धोक्यात आहे.

नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडे

नागपूर: मोठ्या थाटात सुरु करण्यात आलेल्या ग्रीन बसला 'ब्रेक' लागले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडे गेले आहे. प्रवाशांना वातानुकुलीत व दर्जेदार बससेवा देण्याचा प्रयत्न ग्रीन बसच्या माध्यमातून करण्यात येत होता. मात्र प्रवाशांअभावी ही बस शहरात दिवसभर रिकामी फिरत होती. परिणामी राज्यच नव्हे तर, अवघ्या देशवासियांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या नागपूरातील ग्रीन बसचे भविष्य काहीसे धोक्यात आहे.

तिकीट लाल बसच्या तुलनेत अधिक

पर्यावरणपुररक ग्रीनसम्ये इथेनॉल इंधनाचा वापर होत होता. या बसचे तिकीट लाल बसच्या तुलनेत अधिक असल्याने सर्वसामान्यांनी याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मनपासाठी ग्रीन बस पांढरा हत्तीच ठरली होती. ग्रीन बसची मनपावर कोट्यवधीची थकबाकी होती. दरम्यान ग्रीनबसबाबात दिल्लीला २३ तारखेला बैठक बोलवण्यात आली आहे.

ग्रीन बसचा देशात लौकीक

नेहमीच बदलत्या काळाचा वेध घेत आणि विकासाच्या मुदद्यावर अग्रेसर असलेल्या नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूरात ग्रीन बसचा प्रयोग राबविण्यात आला होता. हा प्रयोग राज्यासह देशाच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. कारण, देशातील पहिलीच ग्रीन बस असा या बसचा लौकीक होता.

Read More