Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्युटला मोठा हादरा

पुण्यातील सिंहगड इंस्टिट्यूटला पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशबंदी करण्यात आलीय. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समितीनं हा निर्णय घेतलाय.

पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्युटला मोठा हादरा

पुणे : पुण्यातील सिंहगड इंस्टिट्यूटला पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशबंदी करण्यात आलीय. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समितीनं हा निर्णय घेतलाय.

संस्थेतली प्राध्यापकांचे पगार गेले कित्येक महिने थकले आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन केलंय. या पार्श्वभूमिवर संस्थेच्या अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांना पुढील वर्षी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

या निर्णयमुळे अभियांत्रिकीच्या सुमारे चार हजार जागा कमी होणार आहेत. त्याचप्रमाणे सध्याचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचे काय होणार? हा प्रश्न देखील निर्माण झालाय.

यासंदर्भात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचे पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांनी म्हटलंय

Read More