Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

गँगस्टर संतोष आंबेकरचा बंगला पाडण्याची कारवाई जोमात, आणखी २ दिवस लागणार

गँगस्टर संतोष आंबेकरच्या नागपुरातल्या बंगल्यावर कारवाई

गँगस्टर संतोष आंबेकरचा बंगला पाडण्याची कारवाई जोमात, आणखी २ दिवस लागणार

नागपूर : गँगस्टर संतोष आंबेकरचा नागपूरातला बंगला पाडण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागणार आहेत. कालपासून ही कारवाई सुरु केली असून आजही त्याचा बंगला पाडण्याची मनपाची कारवाई जोमात सुरू आहे. हा बंगला मजबूत असून आजवर एवढं मजबूत बांधकाम पाहिलं नसल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाच्या सहाय्यक आयुक्तांचं म्हणणं आहे. बंगल्याची नुसती बांधकामाची किंमत 3 कोटी असून इंटीरियर आणि जागेची किंमत मिळून 15 ते 16 कोटींचा हा महागडा बंगला आहे.

गँगस्टर संतोष आंबेकर याचा इतवारीतील हमालपुरा येथे हा अनधिकृत बंगला आहे. हा बंगला भूईसपाट करण्याची कारवाई मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या बंगल्यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा होत्या. १६ डिसेंबर २०१९ रोजी मनपाने हा बंगला अनधिकृत असल्याची नोटीस बजावली होती. २ दिवसापासून ही कारवाई सुरु आहे. एकूण ९०३.०१ चौरस मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आला होता.

गँगस्टर संतोष आंबेकर हा सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे. फसवणूक, खून, अपहरण, खंडणी असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. लोकांमध्ये त्याच्या टोळीची दहशत होती. त्याच्या टोळीतील अनेक जण तुरुंगात आहे. 

>

Read More