Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

AC ट्रेन मधून विनातिकीट प्रवास करताय आणि समोरच्या कुणी मोबाईल काढला तर समजून जा...

एसी लोकल किंवा फर्स्ट क्लास डब्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणा-या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एक नवीन व्हॉट्सअप तक्रार क्रमांक जारी करण्यात आला आहे. 

AC ट्रेन मधून विनातिकीट प्रवास करताय आणि समोरच्या कुणी मोबाईल काढला तर समजून जा...

Central Railway AC Local Train :  मुंबईच्या एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तिकीट नसलेल्या प्रवाशांमुळे तिकीट व पास घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्सने आता एसी लोकल किंवा सामान्य लोकल फर्स्ट क्लास डब्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एक नवीन व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक 7208819987 जारी केला आहे.

प्रवाशांना आता कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास या हेल्पलाइनवर तक्रार करण्याची सुविधा आहे. हा व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक फक्त संदेश पाठवण्यासाठी उपलब्ध आहे. याशिवाय प्रवाशांच्या या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्यांनी विशेष देखरेख पथकही तयार केले आहे. या क्रमांकावर तक्रार आल्यावर हे पथक कारवाई करेल. या तक्रारीचे त्वरित निराकरण न झाल्यास दुसऱ्या दिवशी साध्या वेशातील डब्यांवर देखरेख ठेवून ही टीम कारवाई करणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

विना तिकीट AC लोकलचा प्रवास करणा-या एका महिलेनं चक्क टीसीला चावा घेतला

विना तिकीट AC लोकलचा प्रवास करणा-या एका महिलेनं चक्क टीसीला चावा घेऊन पळ काढला..चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान ही घटना घडली..महिला टीसीला ट्रेनमध्ये एका महिलेकडे तिकीट नसल्याचं आढळलं..त्यावरून दोघींमध्ये वाद झाला...या वादातून आरोपीनं टिसीला चावा घेतला..या प्रकरणी वसई पोलिसात गुन्हा दाखल झाला..

पश्चिम रेल्वे मार्गावर बॅटमॅन स्क्वाड 

मुंबई लोकलमधून रात्री 8 वाजल्यानंतर तिकीट तपासनीसांची उपस्थिती कमी असल्यानं विना तिकीट प्रवाशांच्या संख्येत वाढ झालीये. त्यामुळे पश्चिम रेल्वेने एक तिकीट तपासणीसांचा विशेष गट तयार केलाय. या पथकाला बॅटमॅन स्क्वाड असं नाव दिलंय. ज्याचा अर्थ बी अवेअर टीटीई मॅनिंग अॅट नाईट असा आहे. हे पथक फुकट्या प्रवाशांवर कारवाई करते.

Read More