Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

हत्याकांडाने नागपूर हादरलं, कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या

कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

हत्याकांडाने नागपूर हादरलं, कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या

अमर काणे, झी 24 तास नागपूर : नागपूर तहसील पोलीस स्थानकाअंतर्गत एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आलोक माटूरकर असं आरोपीचं नाव आहे. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आलोकने संपूर्ण कुटुंब संपवलं
आलोकने पत्नी विजया माटूरकर, मुलगी परी माटूरकर (14 वर्ष), मुलगा साहिल माटूरकर (12 वर्ष) सासू लक्ष्मीबाई बोबडे आणि मेव्हणी अमीषा बोबडे यांची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक पाचपावली परिसरात रंभाजी रोड बागल व्यायाम शाळेजवळ भाड्याच्या घरात राहत होता. तर सासू आणि मेव्हणी त्यांच्या घरापासून 100 मीटर दूर पटवी गल्ली इथं रहात होते. आलोकने काल रात्री सासू आणि मेव्हणीची हत्या केली. त्यानंतर घरी येऊन पत्नी आणि मुलांची हत्या करत गळफास लावून आत्महत्या केली.

कौटुंबिक कलहातून हत्या?
अलोक हे टेलरिंगचं काम करायचा. अलोकने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकले नाही. पण कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

Read More