Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रक्ताच्या थारोळ्यात डॉक्टर, बघे व्हिडिओ काढण्यात मग्न

दोन मोटरसायकल एकमेकांसमोर धडकल्या. यामध्ये डॉक्टर अनिल देशमुख गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचाराची गरज होती. 

रक्ताच्या थारोळ्यात डॉक्टर, बघे व्हिडिओ काढण्यात मग्न

औरंगाबाद : खुलताबाद घाटात अपघातात जखमी झालेल्या तरुणांची लोकांनी शूटिंग केले. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल केले नाही. त्यातच त्या तरुणांच्या मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा असाच प्रकार औरंगाबादच्या टीव्ही सेंटर भागात घडला आहे. टीव्ही सेंटर भागांमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक एकतर्फी करण्यात आली होती. याच दरम्यान दोन मोटरसायकल एकमेकांसमोर धडकल्या. यामध्ये डॉक्टर अनिल देशमुख गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचाराची गरज होती. मात्र, अनेक जण मोबाईलमध्ये चित्रण करण्यात गुंग होते. ४५ मिनिटे डॉक्टर देशमुख रस्त्यावर पडून होते. त्यांच्या मदतीला कोणीही धावले नसल्याने वेळच उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.

याशिवाय इतरही काही तरुण जखमी झाले. ते किरकोळ जखमी होते. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ४५ मिनिटे डॉक्टर अनिल देशमुख हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरती पडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात उशीर झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पोलीस असूनही त्यांना का मदत झाली नाही, हादेखील प्रश्‍न गंभीर आहे.

लोकही येथेही व्हिडिओ शूटिंग करत होते. मात्र मदत कोणीही केली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा एका एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. सिडको पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मोटरसायकलच्या नंबरवरून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, पुन्हा एकदा मानवता शिल्लक राहिली नाही का, हा प्रश्न या प्रकरणानंतर समोर आला आहे.

Read More