Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ओळख परेडनं संख्याबळ सिद्ध होतं नाही- आशिष शेलार

महाविकास आघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात मध्ये 'आम्ही १६२' या सोहळ्याअंतर्गत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

ओळख परेडनं संख्याबळ सिद्ध होतं नाही- आशिष शेलार

मुंबई : ओळखपरेड ही आरोपींची होते. पण आपल्याच आमदारांना आरोपी समजणे ही लोकशाहीचा अपमान आहे. हा जनतेचा अनादर असल्याची टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. महाविकास आघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात मध्ये 'आम्ही १६२' या सोहळ्याअंतर्गत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

ओळखपरेडमुळे विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाचे संख्याबळ ठरत नाही. अशा प्रकारामुळे आत्मबल गमावलेल्यांचा आत्मबल परत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी दिसल्याचे शेलार यावेळी म्हणाले. आज महाराष्ट्र आणि मराठी माणसाने शरमेने मान खाली घातली असेल. बाळासाहेबांच्या नातवाने सोनिया गांधींच्या नावाची शपथ घेतली. हे समस्त देशाने पाहीलं. शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडी आहे हे संपूर्ण देशाने पाहील्याची टीका त्यांनी शिवसेनेवर केली.  

स्वत:चं आत्मपरिक्षण केलं तर तिथे १४५ आमदार तरी होते का ? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

'आमचा रस्ता मोकळा करा !'

'आम्ही आलेलो आहोत..आमचा रस्ता मोकळा करा !' असे खुले आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. महाविकास आघाडीचे १६२ आमदार मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील याठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील या ठिकाणी भाजपवर टीका केली.

Read More