Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आंबेनळी घाट अपघात : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रीया

 या दुर्घटनेबद्दल देशभरातून दु:ख केलं जातंय.

आंबेनळी घाट अपघात : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रीया

रायगड : दापोली येथून महाबळेश्वरला निघालेल्या  मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या भयंकर दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. केवळ एका प्रवाशाला वाचवण्यात यश आल्याचं समजतंय. अपघातात बसमधली ३४ पैंकी ३३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेबद्दल देशभरातून दु:ख केलं जातंय. केवळ एक प्रवासी या अपघातातून सुदैवानं वाचलाय. प्रकाश सावंतदेसाई असं या प्रवाशांचं नाव आहे. हाती लागलेल्या सर्व मृतदेह आणि  जखमी झालेल्या प्रकाश सावंतदेसाई यांना पोलादपूरच्या ग्रामीम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.   

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे ट्वीट

आत्तापर्यंत आठ-दहा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालंय.चालकाचं नियंत्रण सुटून बस २५०  ते ३०० फूट दरीत कोसळली.

पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय.

 

मदतकार्यात आडथळे

पोलीस यंत्रणा , तसेच महाबळेश्वर आणि रायगडमधून ट्रेकर्स मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पुण्यातून एनडीआरएफचं एक पथक तातडीनं घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलंय. घाटात दाट धुके असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. या बसमध्ये एकूण ३४ प्रवासी होते... हे सर्व जण कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. आंबेनळी घाट हा अतिशय धोकादायक आहे वेडीवाकडी वळणे असल्याने अनेकदा या भागात अपघात होत असतात.

Read More