Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मिनिटाभरात ६२ पुलअप्स काढून आदर्श भोसलेंची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

  केवळ सिक्स अ‍ॅब्स कमावण्यासाठी नव्हे तर फीटनेस वाढवण्यासाठी पुलअप्स हा फायदेशीर व्यायाम प्रकार आहे. या व्यायामामुळे फीटनेस सुधारण्यास मदत मिळते. याकरिता जीम, व्यायामशाळा यांची गरज नसते. मात्र योग्य  मार्गदर्शन आवश्यक आहे.  

मिनिटाभरात ६२ पुलअप्स काढून आदर्श भोसलेंची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

सोलापूर  :  केवळ सिक्स अ‍ॅब्स कमावण्यासाठी नव्हे तर फीटनेस वाढवण्यासाठी पुलअप्स हा फायदेशीर व्यायाम प्रकार आहे. या व्यायामामुळे फीटनेस सुधारण्यास मदत मिळते. याकरिता जीम, व्यायामशाळा यांची गरज नसते. मात्र योग्य  मार्गदर्शन आवश्यक आहे.  

एका मिनिटात ६२ पुलअप्स 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या आदर्श भोसले या युवकाने एका मिनिटात ६२ पुलअप्स काढण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय . आदर्श भोसलेंच्या  विक्रमाची नोंद  गिनीज वर्ल्ड बुक मध्ये होण्यासाठी आपली प्रवेशिका गिनीज वर्ल्ड बुक पाठवणार्‍या , हा विक्रम करताना सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले उपस्थित होते , या अगोदर बल्गेरियाच्या युवकाने एक मिनिटात ५४ पुलअप्स काढून विक्रम केला होता. 

 दोन वर्षांपासून  घेतले परिश्रम

आदर्श भोसलेने एक मिनिटात ६२ पुलअप्स काढून  त्याच्या विक्रमाची  नोंद गिनीज बुक मध्ये व्हावी यासाठी त्याने खूप मेहनत घेतलीय  ,  स्वामी  विवेकानंद आणि  डॉ ए पी जे  कलाम या चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा विक्रम केलाय . यासाठी आदर्श भोसले ने दोन वर्षांपासून परिश्रम घेतले असल्याची माहिती दिली आहे. 

Read More