Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आधार कार्डने मिळवून दिले खरे आई-बाबा; आठ वर्षांनंतर भावूक क्षण

जन्मदात्याशी पुन्हा झाली गळाभेट 

आधार कार्डने मिळवून दिले खरे आई-बाबा; आठ वर्षांनंतर भावूक क्षण

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आठ वर्षापूर्वी हरवलेला मुलगा आधारकार्डमुळे आई वडिलांना पुन्हा मिळाला. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असा हा घटनाक्रम नागपुरात घडला आहे. या घटनेनंतर कुटुंबात आनंदाचं तावरण आहे. (Aadhar card, got, real parents; Emotional, moment, eight years) पाहूया नेमकं काय आहे हा प्रकार? 

दामले कुटुंबासोबत नागपूरच्या नवा नकाशा परिसरात हा मुलगा आठ वर्षापासून राहातोय. समर्थ दामले यांच्या कुटुंबात पत्नी लक्ष्मी व एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 2012 साली दामले कुटुंबात आलेल्या या नव्या सदस्याचं नाव ठेवण्यात आले अमन.  आठ-नऊ वर्षांचा असताना अमन नागपूर रेल्वे स्टेशनवर आढळला. त्यावेळी त्याला नीट बोलताही येत नव्हतं वा त्याला फारस समजत नव्हतं.

चाईल्ड लाईनच्या मदतीने त्याला बालसुधार गृहात ठेवण्यात आले. बाल सुधार गृहातून दामले दाम्पत्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला दत्तक घेतलं. त्याला शाळेत टाकले. आता दहावीत शिक्षण घेत असलेल्या अमनचं आधार कार्ड बनवण्यासाठी समर्थ दामले यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र प्रत्येक वेळी काहीतरी तांत्रिक कारणास्तव त्याचं आधार कार्ड बनत नव्हतं.त्यामुळं समर्थ दामले यांनी मानकापूरच्या आधार सेवा केंद्रात गेले.

तिथे केंद्रीय व्यस्थापक अनिल मराठे यांची भेट घेतली. मराठे यांनी प्रयत्न केल्यावर त्या मुलाचे नाव अमन नसून मोहम्मद आमिर असल्याचे आधार कार्डमुळं लक्षात आलं.  आधार कार्डमुळं आठवर्षांनी अमन जबलपूरचा असल्याचं माहित झाल्यानंतर समर्थ दामले यांनी सांगितलं. त्याच्या खऱ्या आई वडिलांशी संपर्क साधला.

तब्बल आठ वर्षांनी  मुलगा सुखरूप असल्याचे समजल्यावर त्याचे वडिला मोहम्मद अय्युब आणि त्यांच्या कुटुंबाला सुखद धक्का बसला. खऱ्या आई-वडिलांनी तातडीनं नागपूर गाठलं. लहानपणी दुरावलेल्या आईवडिलांना आमीर ओळखू शकला नाही. पण हेच तुझे खरे आई-बाबा असल्याचे दामले कुटुंबीयांनी त्याला समजावले. पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण  करून दामले दाम्पत्य अमीर उर्फ अमनला त्याच्या ख-या आईवडिलांकडे सुपुर्द  केलं. यावेळी दामले कुटुंब खूप भावनावष झालं होतं.

ज्यांनी 8 वर्षांपेक्षा जास्त काळ सांभाला केला ज्यांना तो आपले आई वडील मानले त्यांच्या पासून विभक्त होण्याचं दुःख अमनला आहे. मात्र त्याचबरोबर ख-या आईवडिल मिळाल्यानंतर त्याला पुन्हा हरवण्यापूर्वीच्या सर्व गोष्टीचं स्मरण होत असल्याचा आनंदही आहे. आधार कार्डमुळे अमनचा त्याचे ख-या आईवडिल गवसले आणि मोहम्मद अय्युब यांना आठ वर्षांनी आधार मिळाला.

Read More