Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

याला म्हणतात शेरास सव्वा शेर! रेड्याला बघून प्रॉब्लेम दहा मिनिटांत सोडवला

ग्रामपंचायत  ऑफिसमध्ये रेडा पाहून सगळेच  गोंधळून गेले. रेड्याला पाहून ग्रामपंचायत आलेले नागरीक येथे काम करणार कर्मचारी सगळ्यांचीच पळापळ झाली. 

याला म्हणतात शेरास सव्वा शेर! रेड्याला बघून प्रॉब्लेम दहा मिनिटांत सोडवला

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा: सरकारी काम आणि दहा महिने थांब. अनेक हेलपाटे घातले तरी सरकारी अधिकाऱ्यांकडून कामाची दखल घेतली जात नाही. समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मग लोक आंदोलनासारखे हत्यार उपसतात. मात्र, आंदोलन करुनही प्रश्न सुटत नाहीत.  साताऱ्यातील(Satara) एका पट्ट्याने आपल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी असं डोकं लावल की ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी(gramampchayat office) फक्त दहा मिनिटांत त्याची समस्या मार्गी लावली. 

रेडा बघून ऑफिसमध्ये पळापळ

साताऱ्यातील एका समस्याग्रस्त व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर रेडा नेऊन आंदोलन केले आहे. ग्रामपंचायत  ऑफिसमध्ये रेडा(bull ) पाहून सगळेच  गोंधळून गेले. रेड्याला पाहून ग्रामपंचायत आलेले नागरीक येथे काम करणार कर्मचारी सगळ्यांचीच पळापळ झाली. 

कराड -वडगाव हवेली येथील दीपक जगताप नावाचा व्यक्ती रेडा घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यलयात गेला. आपला प्रश्न तात्काळ सुटावा यासाठी त्याने हे अनोखे आंदोलन केले आहे. हे आंदोलन करण्यामागचं कारण पण तसच आहे. या व्यक्तीच्या घरा समोरची पाण्याची पाईप लाईन फुटून अनेक दिवस झाले आहेत. अनेकदा तक्रार करुनही पाईपलाईनची दुरुस्ती झालेली नाही. 

घरासमोर बसत होता रेडा

या फुटलेल्या पाईपमुळे जगताप यांच्या घराबाहेर पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यात हा रेडा बसत होता. यामुळे जगताप यांच्या सह त्यांचे कुटुंबिय रेड्यामुळे त्रस्त झाले होते.  यामुळे त्रस्त झालेले जगताप हा रेडा घेऊन डायरेक्ट ग्रामपंचायतीत तिसऱ्या मजल्यावर घेवून गेले. रेड्याला पाहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.

अनोखे आंदोलन बघून ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अवघ्या दहा मिनीटांत दीपक जगताप यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. जगताप यांच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा होत आहे. तसेच त्यांच्या या कृतीचे कौतुकही होत आहे. 

Read More