Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे. 

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणार

Maharashtra Politics : येत्या काही दिवसात महाष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.  विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासआघाडीने कंबर कसली आहे. अशातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार आहे. महाराष्ट्रातील चार स्थानिक राजकीय पक्ष एकत्र येणार आहेत. हे चार ही पक्ष  एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. 

तिसरी आघाडी नेमकी कुणाची?

विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकरांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राज्यात महायुती आणि मविआनंतर लवकरच तिसरी आघाडीनिर्माण होऊ शकते. यासंदर्भात बच्चू कडूंना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिलीय. तसंच तिस-या आघाडीचा पर्याय चांगला ठरू शकेल असं रविकांत तुपकरांनी म्हटलंय. 

बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले

महायुतीचे घटक असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.  बच्चू कडू महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत 20 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. बच्चू कडू हे महायुतीत नाराज असल्याची देखील चर्चा रंगली आहे.  बच्चू कडू यांनी विधानसभेला एकला चलो चा... नारा दिला आहे.  विधानसभेसाठी 20 जागा लढवणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू महायुतीतून निवडणूक लढवणार नाहीत अशी देखील चर्चा आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये चर्चा करून महाराष्ट्रात मजबूत उमेदवार उभा करुन 20 जागा लढविण्याचा निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले. 

 

Read More