Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Dombivli Fire : डोंबिवलीत मोठी आग, कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या दोन कंपन्या भस्मसात

Dombivli Fire : डोंबिवलीत मध्यरात्री एमआयडीसी फेज वनमध्ये एका कारखान्यात आग लागली. या आगीचे लोक जवळपास एक किमी अंतरावरुनही दिसत होते. सीएनजी पंपालगतच्या कारखान्याला आग लागल्याने चिंता व्यक्त होत होती. रामसन्स आणि प्रयाग या दोन कंपन्यात ही आग लागली. कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या या दोन कंपन्या आहेत.

Dombivli Fire : डोंबिवलीत मोठी आग, कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या दोन कंपन्या भस्मसात

Dombivli Fire : डोंबिवली एमआयडीसीत मध्यरात्री दोन कंपन्यांना आग लागली. संपूर्ण रात्र हे अग्नितांडव सुरु होते. एमआयडीसी फेज 1 भागात रात्री 1 वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली. खंबाळपाडा भागानजीक असलेल्या एमआयडीसीत रामसन्स आणि प्राज या दोन कंपन्या आगीत जळून भस्मसात झाल्या. आधी प्राज या कंपनीत आग लागली. ती आग पसरत शेजारच्या रामसन्सलाही लागली. दोन्ही कंपन्यांत मोठमोठाले स्फोट होत होते. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. यातील एक कंपनी परफ्यूम तयार करते तर दुस-या कंपनीत कापड तयार होते. ही आग एवढी मोठी होती की डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे इथल्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

आग लागलेल्या ठिकाणाच्या अगदी शेजारी सीएनजी पंप होता. त्यामुळे आगीच्या ज्वाला पंपापर्यंत पोहोचू न देण्यासाठी आटापिटा सुरू होता. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. 

Read More