Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ही शेवटची तारीख

 पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ही शेवटची तारीख

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने पुरूष सुरक्षा रक्षक पदासाठी सात हजार जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू केली आहे. 

ही भरती कंत्राटी पद्धतीनं असेल. ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० आहे. इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान ५० टक्के गुण असणं अनिवार्य आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना दरमाह १७ हजार रूपयांचं वेत दिलं जाईल. शिवाय इतर भत्तेही मिळणार आहेत.

Read More