Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या

Nerul News :  नवी मुंबईत एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नवी मुंबई शहरात दहशत पसरली आहे. 

अरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या

Navi Mumbai Crime News :  अरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या झाली आहे. नेरुळ परिसरात हत्येचा हा थरार घडला आहे. हल्लेखोरांच्या हल्ल्यात मृत गुंडाची प्तनी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई शहरात दहशत पसरली आहे. 

चिराग लोके असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे.  चिराग महेश लोके (वय 30 वर्षे) हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहणारा आहे.  माथाडीच्या साईटवरुन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी चिराग लोके याची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात लोके याची पत्नी प्रियंका लोके (28) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नेरुळ मधील डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

का केली हत्या? 

या घटनेतील मृत चिराग लोके हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहत होता. तसेच तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता. चिराग लोके याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहुन नेरुळ पोलिसांनी त्याच्यावर काही दिवसांपुर्वी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चिराग लोके व त्याची पतत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवुन लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेली असता, या हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करुन पलायन केले. यात चिरागचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली असून तीच्यावर नेरुळ मधील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन अशा एकुण पाच मारेकऱयांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

दरम्यान, मृत चिराग महेश लोके व आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा हे दोघे एकाच जेल मध्ये होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद डोसा व चिराग यांच्यामध्ये मानखुर्द येथे असलेल्या माथाडी साईटवरुन वाद सुरु होता. याच वादातून गत 9 फेब्रुवारी रोजी चिराग व त्याची पत्नी प्रियांका या दोघांना काही गुंडांनी माथाडी साईटच्या वादातून धमकावले देखील होते. याच वादातून चिरागची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार नेरुळ पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.

पनवेलच्या फार्म हाऊसवर हाफ चड्डी गँगचा धुमाकूळ; बंगल्यात घुसले पण...

पनवेलच्या फार्म हाऊसवर हाफ चड्डी गँगने धुमाकूळ घातला आहे. बंगल्यात घुसणारे दरोडेखोर कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे पनवेलकरांमध्ये हाफ चड्डी गॅंगची दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.  उसर्ली-शिवकर गावातील एका फार्म हाऊसवर हाफ चड्डी घालून सहा चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पनवेल शहर पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील उसर्ली-शिवकर गावातील राकेश जैन यांच्या फार्महाऊस वर एका हाफ चड्डी गँगने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फार्म हाऊस वर किंमती ऐवज नसल्याने या चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.  परिसरात हाफ चड्डी घालून चोरी करणारे कुठल्या टोळीचे आहेत का याचा तपास सुरु आहे.  फार्म हाऊसवरील सुरक्षा रक्षक आणि ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सूचना पनवेल शहर पोलिसांनी केल्या आहेत. त्यासोबतच नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून गस्त वाढवत नाकाबंदीचे देखील  करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

Read More