Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी, सर्वाधिक मालवणला पसंती

  थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती मालवणला आहे. 

सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी, सर्वाधिक मालवणला पसंती

सावंवाडी :  थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती मालवणला आहे. 

हॉटेल सध्या हाऊसफुल्ल 

वर्ष अखेर आणि नाताळच्या सु्ट्ट्या यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांसी हॉटेल सध्या हाऊसफुल्ल आहेत. मालवण, वेंगुर्ले आणि देवगडला पर्यटकांनी सध्या विशेष पसंती दिलीय. 

 खास पर्यटन महोत्सवाचं आयोजन 

मालवणला येणारे पर्यटक तारकर्ली, देवबाग येथे जाऊन स्कुबा डाईव्हिंगचा आनंद लुटताहेत. देवगडमध्ये तर खास पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मालवणमध्ये आलेल्या पर्यटकांमुळे हॉटेल व्यवसाय तेजीत आहे. तर सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळाताहेत. 

रत्नागिरीलाही पसंती

दरम्यान, रत्नागिरी आणि रायगडलाही पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहतेय. येथील सर्वच ठिकाणी गर्दीने फुलली आहेत. रत्नागिरीत गणपतीपुळे, मालगुंड, रत्नागिरी, भाट्ये , दापोली, गुहागर आदी ठिकाणचे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिसत आहे.

रायगडही पर्यटकांनी फुललेय

तर रायगडात नाताळच्या सुटीला लागून आलेल्या विकेंन्डमुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे रायगडच्या अलिबाग, मुरूड, काशीद, दिवेआगर या समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहेत.

Read More