Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

Sanjay Raut Trouble : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

Sanjay Raut Trouble : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे सरकार बेकायदेशीर असून या सरकारचे आदेश पाळू नये, असे वक्तव्य केले होतं. त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार केदारे यांच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले. त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला बेकायदेशीर ठरवले आहेत. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्या आहे. अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करु नये, असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

 संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने ठाकरे गटाची अडचणी निर्माण झाली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ही टीका करताना नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, हे सरकार बेकायदेशीर असून या सरकारचे आदेश पाळू नये अशा प्रकारचं आवाहन केले होते. सरकारी यंत्रणांना केल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी केला गुन्हा दाखल, कलम 505/1 (ब) भा.दं.वि. सह कलम पोलिसांप्रती अप्रीतीची भावना, चिथावणी (1922 कायदा) असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस हवालदार केदारे यांनी फिर्यादी दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने या सरकारचे वाभाडे काढले आहे. निकाल स्पष्ट आहे. ज्याला कायदा कळतो त्याला कळेल. काल काही लोक नाचत होते. त्यांचे कपडे काढून त्यांना अध्यक्षाकडे पाठवलं आहे. राज्यपालनि घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरवले आहे. आमचा व्हीप खरा आहे. मग हे का नागडे नाचत आहे?  सर्वच न्यायालयाने सांगितलं आहे की तेव्हाची परिस्थिती पाहून निर्णय घ्यायला लावला आहे. हे सरकार बेकायदा आहे. पोलिसांना अधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे. त्यांनी आदेश पाळू नये, असे राऊत यांनी म्हटले होते.

Read More