Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोरेगाव भीमा हिंसाचारात ९.५० कोटींचे नुकसान

१ जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचारात ९.५० कोटींचे नुकसान

पुणे : १ जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

सनसवाडी आणि कोरेगाव भीमा मध्ये दंगलीदरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनानं केले आहेत. त्यामध्ये दगडफेक तसेच जाळपोळीमध्ये अनेक खाजगी तसेच सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्याची माहिती घेण्यासाठी प्रशासनानं १७० पेक्षा अधिक ठिकाणचे पंचनामे केले आहेत.

११६ चारचाकी वाहनं, ९३ दुचाकी वाहनं , ५ तीन चाकी वाहनं, १८ घरं, ८२ हॉटेल आणि दुकानं, १४ गॅरेजांचं यामध्ये नुकसान झालं आहे.

पाहा व्हिडिओ

Read More