Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अर्बन बॅंकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखांचा गंडा

कोल्हापुरातील अर्बन बँकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखाचा गंडा

अर्बन बॅंकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखांचा गंडा

कोल्हापूर : कोल्हापुरातील अर्बन बँकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखाचा गंडा घालण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. कोल्हापुरातील शाहूपूरी परिसरात असलेल्या अर्बन बॅंकेला हा फटका बसला आहे. ऑनलाईन गंडा घालण्यामागे सराईत हॅकर्सचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार केली असून अधिक चौकशी सुरू आहे. ही ऑनलाईन चोरी करतना डिजीटल पेमेंटल सिस्टिमचा गैरवापर  करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

अवघ्या साडेतीन तासात कोल्हापुरातील अर्बन बँकेचे पैसे लंपास झाले आहेत. हॅकर्सनी बॅंकेच्या ऑनलाईन व्यवस्थेचे तीनतेरा वाजवले आहेत. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असून हॅकर्सचा शोध घेत आहेत. डिजिटल पेमेंट सिस्टीमचा गैरवापर करून अर्बन बँकेचे पैसे लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read More