Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी अंत

गारपिटीचा फटका हा पक्षी-प्राण्यांनाही बसतोय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथे मंगळवारी रात्री तुफान गारपीट झाली. 

गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी अंत

भंडारा : गारपिटीचा फटका हा पक्षी-प्राण्यांनाही बसतोय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथे मंगळवारी रात्री तुफान गारपीट झाली. 

३०० पोपटांचा दुर्दैवी अंत

या गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्देवी मृत्यू झालाय. परिसरात असलेल्या शिव मंदिराजवळ गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती आहे. मात्र, मंगळवारी झालेल्या तुफान गारपिटीमुळे या झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. यापैकी ३०० पोपटांचा दुर्देवी अंत झाला आहे. 

काटोलमध्ये ६० बगळ्यांचा अंत

राज्यात एकीकडे गारपिटीने आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून चार जण जखमी झालेत. गारपिटीचा तडाखा पिकांसोबतच पक्ष्यांनाही बसला. काटोल तालुक्यात झालेल्या जोरदार गारपिटीत झाडांवर बसलेल्या बगळ्यांचा बळी गेला. झिलपा गावात अचानक झालेल्या गारपिटीत झाडांवर बसलेले सुमारे 60 बगळे मृत्युमुखी पडले. पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी बगळ्यांना वाचवण्यासाठी आग पेटवली. टायर जाळून बगळ्यांना ऊब देण्यात आली. त्यामुळं सुमारे 100 बगळ्यांचे प्राण वाचले.

Read More