Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

CoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव

CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली

CoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव

CoronaVirus : महाराष्ट्राची चिंता वाढवणारं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. परदेशवारी करून राज्यात परतलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. बरं, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये (Mumbai Corona) आलेल्या या नागरिकांना कोरोनाच्या BF.7 या घातक विषाणूचीच लागण झाल्यामुळं आता चिंता वाढली आहे. कोरोनामुळं चीनमध्ये हाहाकार माजवणारा हा विषाणू राज्यात शिरकारव करतो हे पाहून आता आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. 

कुठून आले हे प्रवासी? 

मुंबईत दाखल झालेल्या या तीन कोरोनाबाधित प्रवाशांपैकी दोन प्रवासी चीनमधून (China) आले होते तर एक प्रवासी कॅनडाहून (Canada) आला होता अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. प्राथमिक सावधगिरी म्हणून या तिघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तिनही कोरोनाबाधितांनी लस घेऊनही त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही, असंही सांगण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : Gautam Adani: भारत श्रीमंतांचाच? मग गरीबांनी जायचं तरी कुठे? Oxfam आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

 

दरम्यान, चीनमध्ये दर दिवसागणिक वाढणारा कोरोनाचा धोका पाहता, देशातील विमानतळांवर केल्या जाणाऱ्या RTPCR चाचण्यांमध्ये जे नागरिक कोरोना (Coronavirus) पॉझिटीव्ह आढळत आहेत त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. केंद्र सरकारकडूनच यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. 

देशातील 'या' राज्यात कोरोनाच्या धर्तीवर कठोर पावलं उचलण्यास सुरुवात 

कोरोनाचा फैलाव संपूर्ण देशासाठी सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख पाहता सध्या केरळ राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. सरकारकडून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार सार्वजनिक ठिकाण, कार्यालयं अशा ठिकाणांवरही हा नियम लागू असेल. राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करावं असं आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 

पुढील 30 दिवस म्हणजेच साधारण महिनाभर हे नियम केरळमध्ये लागू असणार आहेत. सदरील नियमांअंतर्गत केरळमध्ये दुकानं, सिनेमागृह आणि तत्सम ठिकाणांवर सॅनिटायझरचाही वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळं कोरोनाची दहशत पुन्हा एकदा आपल्याला 'त्याच' दिवसांमध्ये माघारी नेते का अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. 

 

 

 

Read More