Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बिबट्याच्या तीन बछड्यांचा आगीत होरपळून मृत्यू

जुन्नरमध्ये बिबट्याच्या तीन बछड्यांचा होरपळून मृत्यू झालाय.

बिबट्याच्या तीन बछड्यांचा आगीत होरपळून मृत्यू

जुन्नर : जुन्नरमध्ये बिबट्याच्या तीन बछड्यांचा होरपळून मृत्यू झालाय.

ओझर इथं राजेंद्र जगदाळे यांच्या ऊसाच्या शेतात आग लागली होती. याच आगीत बिछड्याचे हे बिबट्याचे तिन्ही बछडे होरपळले असून त्यांचा मृत्यू झालाय. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचलेत. या घटनेने बिबट्यांच्या बछड्यांचा हतनाक जीव गेला आहे. 

चंद्रपूरमध्ये वाघाच्या मृत्यूचे सत्र सुरू 

तसेच चंद्रपूर जिल्ह्यात  वाघ मृत्यूचे सत्र देखील  सुरु आहे. ताज्या घटनेत एका वाघीणीचा मृत्यू झाला आहे . ब्रम्हपुरी वनक्षेत्रात असलेल्या तळोधी जंगलातल्या गंगासागर हेटी परिसरातील कक्ष क्र. 90 RF येथे ही वाघीण मृतावस्थेत आढळली. वनविभागाच्या पेट्रोलिंग दरम्यान ही वाघीण आढळल्यावर तातडीने वरिष्ठ वनाधिका-यांना याची माहिती देण्यात आली. 

हा भाग वनविभागाच्या तळोधी प्रादेशिक जंगलाचा भाग आहे. संध्याकाळ झाल्याने या वाघिणीला लगतच्या सावरगाव वन डेपोत रवाना केले गेले. सकाळी मृत वाघिणीचे शवविच्छेदन केल्यावर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. २०१८ वर्षात वाघ मृत्यूची ही दुसरी घटना असून ११ दिवसांपूर्वी सिंदेवाही जंगलातील मेंढामाल जंगलात वाघाचा मृत्यू झाला होता. 

Read More