Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रत्नागिरीत डिझेलचे पैसे न भरल्यानं २२५ बसफेऱ्या रद्द

२२५ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.

रत्नागिरीत डिझेलचे पैसे न भरल्यानं २२५ बसफेऱ्या रद्द

रत्नागिरी : रत्नागिरीच्या एसटी डेपोत डिझेलचा खडखडाट झाल्याने तब्बल २२५ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. डिझेलसाठीचे पैसे न भरल्यानं एसटी बसमध्ये भरण्यासाठी डिझेलच उपलब्ध नाही. डिझेलच्या तुटवड्याने आज दिवसभर अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला.कोकणातल्या ग्रामीण भागातील लाईफ लाईन ओळखल्या जाणाऱ्या एसटीवर येवू नये अशी वेळ आज आली आहे.

प्रवाशांकडे दिलगिरी

 यापुर्वी शिवशाही बसेसवर जप्तीची वेळ आली होती. आता यावेळेस  डिझेलचे पैसे वेळेवर न भरल्यानं चक्क रत्नागिरीच्या एसटी डेपोत डिझेलचा तुटवडा पहायला मिळाला. डिझेलचे पैसे वेळत भरले नसल्यानं हि समस्या उदभवली आहे. त्यामुळे प्रवाशांकडे दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली. डिझेलच्या तुटवड्यामुळे रत्नागिरी डेपोतील तब्बल ४ हजार किलोमिटरवरिल २२५ बस फे-या रद्द करण्यात आल्या. रत्नागिरी एस.टी. डेपोला दर दिवशी सहा ते सात हजार लिटर डिझेल लागते. शनिवारी डिझेलचे टँकर न आल्यामुळे दुपारी १ वाजल्यापासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे रत्नागिरी एस.टी.डेपोचे सुमारे ३ ते ४ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Read More