Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अहमदनगर शिवसैनिक दुहेरी हत्याकांडप्रकरण, संग्राम जगतापांसह 4 जणांना पोलीस कोठडी

अहमदनगर केडगाव इथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, विशाल कोतकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर इतर 22 जणांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलीय. 

अहमदनगर शिवसैनिक दुहेरी हत्याकांडप्रकरण, संग्राम जगतापांसह 4 जणांना पोलीस कोठडी

नगर : अहमदनगर केडगाव इथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, विशाल कोतकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर इतर 22 जणांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलीय. 

शनिवारच्या घटनेनंतर शिवसेनेचे दोन नेते रामदास कदम आणि दिवाकर रावते नगरमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेऊन शासकीय विश्रामगृहात चर्चा केली. दरम्यान नगरमधील प्रकार हा राजकीय वाद नसून भाऊबंदकीचा वाद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. 

Read More