Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

16 वर्षांचा मुलगा इमारतीच्या गच्चीवर पब्जी खेळत होता, आणि पाय घसरला...

पालघरमधील धक्कादायक घटना, पब्जी खेळता खेळता तो गच्चीच्या टोकावर आला आणि...   

16 वर्षांचा मुलगा इमारतीच्या गच्चीवर पब्जी खेळत होता, आणि पाय घसरला...

पालघर :  मुलं आणि तरुणांमध्ये 'पब्जी' (PUBG) या ऑनलाईन मोबाईल गेमची अजूनही 'क्रेझ' आहे. पण या गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढत आहे.  काहींनी पबजी गेमच्या वेडापायी आपले प्राण गमावले तर काहींनी आपले मानसिक स्वास्थ बिघडवून घेतलं. त्यामुळे गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून होत होती. याची गंभीर दखल घेत केंद्रानेही या गेमवर बंदी आणली.

पण बंदी असतानाही तरुण आणि लहान मुलं पब्जी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पब्जी खेळताना अपघात झाल्याचा एक धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. 

पब्जी खेळणं पालघर मधल्या शिरगाव इथल्या एका 16 वर्षीय तरुणाला चांगलचं महागात पडल आहे . शादान शेख अस या युवकाच नाव असून तो आपल्या मित्रांसोबत शिरगाव इथल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर पबजी खेळत होता. मात्र तो या पब्जी खेळण्यात इतका गुंतला की तो इमारतीच्या गच्चीच्या टोकावर कधी आला त्याला कळलंच नाही. 

खेळता खेळता अचानक हा युवक दुसऱ्या माळ्यावरून खाली पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे . जखमी शादानवर सध्या पालघर मधील रिलीफ रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

नाशिकचा मुलगा नांदेडला पोहचला
काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. पब्जी खेळायला मिळावं यासाठी बारा वर्षांच्या मुलाने घर सोडलं. नांदेडमध्ये राहाणारा बारा वर्षांचा मुलगा पब्जी खेळण्यासाठी मोबाईल घेऊन घरातून निघून गेला. आई-वडिलांनी मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी तातडीने तपास सुरु करत मुलाचा मोबाईल ट्रॅक केला. यावेळी तो मुलगा मुंबई-तपोवन एक्स्प्रेसने मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली. एक्स्प्रेस नाशिकमध्ये पोहचल्यावर नाशिक पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं.

पब्जी गेम बंदीनंतरही सुरु
तरुणाईमध्ये पब्जी गेमचं व्यसन आहे. केंद्र सरकारने पब्जीसह 118 अॅपवर बंदी घातली आहे. पण यानंतरही तरुण आणि लहान मुलं पब्जी खेळताना दिसत आहेत. 

Read More