Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Ind vs Pak Live : विकेट घेण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश, रिझवान-बाबरचा तुफानी जलवा

भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकबल्याला सुरुवात

 Ind vs Pak Live :  विकेट घेण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश, रिझवान-बाबरचा तुफानी जलवा
LIVE Blog

दुबई: भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर 

24 October 2021
22:13 PM

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम-रिझवानची तुफान फलंदाजी, 10 ओव्हर्समध्ये 71 धावा

22:13 PM

विकेट घेण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश, रिझवान-बाबरचा तुफानी जलवा

21:36 PM

पाकिस्तानची फलंदाजी...रिझवान- बाबार फलंदाजीसाठी मैदानात

21:36 PM

भुवनेश्वर कुमार बॉलिंगसाठी मैदानात...पाकिस्तानची दमदार सुरुवात कोहलीचं टेन्शन वाढलं

21:35 PM

20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 151 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाला विराट सेनेनं 152 धावांचं आव्हान दिलं आहे.

21:04 PM

किंग कोहलीचं अर्धशतक पूर्ण, 48 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं केले 57 रन

21:03 PM

रविंद्र जडेजा 13 धावा करून तंबुत परतला

20:43 PM

 ऋषभ पंत कॅच आऊट, 2 चौकार आणि षटकारांच्या मदतीनं 30 बॉलमध्ये केले 39 रन

20:01 PM

सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये येताच कॅचआऊट, 1 सिक्स आणि 1 चौकाराच्या मदतीनं 8 बॉलमध्ये 11 धावा 

19:55 PM

कोहलीचा आफ्रिदीला दणका....विराट कोहलीने ठोकला पहिला सिक्स

19:51 PM

टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का, के एल राहुल तंबुत परतला 

19:39 PM

के एल राहुल आणि विराट कोहली क्रिझवर...सात बॉलमध्ये के एलने काढले तीन रन

19:34 PM

पाकिस्तानचा वेगवान बॉलर शाहिनचा दणका, तिसऱ्या बॉलवर रोहित शर्मा आऊट, टीम इंडियाला मोठा धक्का

19:34 PM

महामुकाबला सुरू... ओपनिंगसाठी मैदानात उतरले के एल राहुल- रोहित शर्मा 

19:16 PM

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमां, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हारिस रऊफ आणि शाहीन अफरीदी

19:16 PM

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन 
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली ( कर्णधार),सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

18:35 PM

जेव्हा भारत-पाक सामना बनला संघर्षाचा आखाडा, मैदानावरच खेळाडू एकमेकांना भिडले

https://zeenews.india.com/marathi/sports/india-pakistan-matches-all-disputes/589498

18:16 PM

विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल.राहूल, हार्दिक पांड्या असे तगडे बॅट्समन भारताच्या ताफ्यात आहे. तर पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्यासाठी बुमराह, शमीच्या रूपात भेदक बॉलर्स भारताकडे आहेत. याशिवाय आर.अश्विन आणि जडेजाचा फिरकी माराही भारताच्या ताफ्यात आहे. तर पाकिस्तानच्या भात्यात बाबर आझम, फकर झमान, मोहम्मद रिझवान, शाहिन आफ्रिदीसारखे खेळाडू आहेत. त्यामुळे आज तमाम क्रिकेटप्रेमींना एक रंगतदार मुकाबला पाहायला मिळणार यात शंका नाही. 

18:16 PM

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येतायेत. दुबईतल्या इंटरनॅशनल स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा रंगणार आहे. पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी विराट सेना सज्ज झाली आहे. या मॅचमध्ये टीम इंडिया फेव्हरिट मानली जातेय. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाकिस्तानला भारताविरोधात एकही मॅच जिंकता आलेली नाही त्यामुळे आजही भारतीय टीम आपल्या विजयाची परंपरा कायम राखेल असा विश्वास तमाम भारतीयांना वाटतोय. 

Read More