Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Live Update : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE

Live Update : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE
LIVE Blog
27 September 2022
16:31 PM

maharashtra political crises : पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय सभापती आणि कोणीही घेऊ शकत नाही. जर तुम्ही पक्षाचे सदस्यत्व सोडले तर चिन्हांच्या ऑर्डरच्या पॅरा 15 अंतर्गत कसे कार्य करू शकता. - सिंघवी

16:27 PM

maharashtra political crises : दहाव्या अनुसूचीच्या संदर्भात पक्षांतर्गत लोकशाहीवरील युक्तिवाद मला समजत नाही. याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांशी हातमिळवणी करून कोणतेही सरकार पाडू शकता का? - सिब्बल

 

16:22 PM

maharashtra political crises : ज्यांनी सदस्यत्व सोडले ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत - सिब्बल

 

16:22 PM

थोड्याच वेळात निकाल अपेक्षित.

16:20 PM

 maharashtra political crises : कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या नोटीशीच वाचन सुरू

16:14 PM

maharashtra political crises :  शिवसेनेत 2 गट आहेत असंआयोग कसे ठरवू शकते - सिब्बल

16:10 PM

maharashtra political crises : पक्षाकडून शिंदेंची नियुक्ती केली होती - कपिल सिब्बल

16:08 PM

एकनाथ शिंदेंनी स्वेच्छेने सदस्यत्व सोडले - कपिल सिब्बल

15:58 PM

maharashtra political crises : कपील सिब्बल यांचा युक्तीवाद सुरू 

15:12 PM

maharashtra political crises : उद्धव ठाकरे  2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष आहेत - कपिल सिब्बल

14:39 PM

maharashtra political crises : आमदार अपात्र ठरण्याचा अधिकार स्पीकरला, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद

14:34 PM

maharashtra political crises : आमदार अपात्र ठरवणं पक्षाचा अधिकार नाही, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद

14:31 PM

maharashtra political crises : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू, 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुरू

13:01 PM

maharashtra political crises : बहुमत नसताना गटनेतेपदावरुन हटवलं, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद.

 

12:43 PM

maharashtra political crises : बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरेंचा राजीनामा, शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद.

12:29 PM

maharashtra political crises : बहुमत नसल्यानं हकालपट्टीचा अधिकार नाही, शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद.

12:28 PM

maharashtra political crises : शिंदेंची हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद.

11:51 AM

maharashtra political crises : शिंदेंकडे विलिनीकरण हाच पर्याय, ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांचा कोर्टात युक्तिवाद.

11:46 AM

maharashtra political crises : शिंदे गटाला नवीन पक्ष काढावा लागेल, ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांचा कोर्टात युक्तिवाद.

11:23 AM

maharashtra political crises : पक्षादेश डावलला तर पक्षाला कारवाईचा अधिकार, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.

11:11 AM

maharashtra political crises : 'अपात्रतेचा पक्षचिन्हावर कसा परिणाम होईल?' सुप्रीम कोर्टाता कपिल सिब्बल यांना सवाल.

11:05 AM

maharashtra political crises : 'मूळ सेना तुमची मग व्हीप का पाळला नाही'?, 'एकनाथ शिंदे कोणत्या अधिकारात आयोगाकडे गेले'? ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा सवाल

11:03 AM

maharashtra political crises :  19 जुलैला शिंदे एकटे निवडणूक आयोगासमोर गेले, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद

11:00 AM

maharashtra political crises : पक्ष बैठकीला गैरहजर राहिल्यानं हकालपट्टी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद.

10:49 AM

maharashtra political crises : आयोगाच्या कामकाजाबाबत स्पष्टता यावी, शिंदे गटाच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद.

10:46 AM

maharashtra political crises :    राजकीय पक्षाचं चिन्ह आणि अपात्रतेचा काही संबंध नाही, शिंदे गटांच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद.

10:45 AM

maharashtra political crises : सेनेच्या चिन्हाबाबत सगळ्यांनी बाजू मांडा, धनुष्य  बाण चिन्हाबाबत बाजू मांडण्याचे घटनापीठाचे आदेश.

10:38 AM

maharashtra political crises : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू, 5 न्यायमूर्तींच्या घटनापाठीसमोर सुनावणी सुरू, सुप्रीम कोर्टातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण.

09:24 AM

Pune Beaten : पुण्यात फक्त बघितले म्हणून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सिंहगड परिसरातल्या धायरी येथील घटना, मारहाण करणाऱ्या 6 जणांना अटक.

08:19 AM

Russian Khosta Virus : रशियामध्ये सापडला कोरोनासारखा व्हायरस, खोस्ता 2 व्हायरसनं रशियासह जगाची चिंता वाढवली, खोस्ता 2 व्हायरस मानवी पेशींवर करतो हल्ला, खोस्ता 2 व्हायरसचा प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका.

08:09 AM

Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी, ईडीचा राऊतांच्या जामिनाला तीव्र विरोध, राऊतांना दिलासा मिळणार का याकडं लक्ष.

08:08 AM

PFI Raid : 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापे, संभाजीनगर आणि सोलापुरातही PFIच्या कार्यालयांवर छापे, संभाजीनगरमधून पीएफआयचे 13 कार्यकर्ते ताब्यात, सोलापुरातून एका संशयिताला एनआयएनं घेतलं ताब्यात.

07:33 AM

Central Government On PFI : PFIवर बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार, PFIवर बंदीची विविध राज्यांची मागणी, NIA आणि ED छाप्यांमधील पुराव्यांच्या आधारे बंदीचा विचार, गुप्तचर खात्याच्या हाती PFIचे सर्व कट, सूत्रांची माहिती

07:06 AM

Maharashtra Political Update : राज्यातील सत्तासंघर्षावर 5 न्यायमूर्तींच्या घटनापाठीसमोर आज सुनावणी, राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लाईव्ह पाहता येणार.

Read More