Marathi News> Lifestyle
Advertisement

वर्षानुवर्ष एकाच गादीवर झोपता? मग थांबा, जाणून घ्या किती वेळानंतर गादी आणि उशी बदलली पाहिजेत?

प्रत्येक वस्तूला एक्सपायरी डेट ही असते. जर एक्सपायरी डेटनंतर आपण त्या वस्तूचा वापर केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. अशात वर्षानुवर्ष एकच गादी आणि उशीवर तुम्ही झोपत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

वर्षानुवर्ष एकाच गादीवर झोपता? मग थांबा, जाणून घ्या किती वेळानंतर गादी आणि उशी बदलली पाहिजेत?

आपण बाजारात जातो तेव्हा कुठलीही वस्तू विकत घेताना आधी त्याची एक्सपायरी डेट पाहतो. मग ते खाद्यपदार्थ असो किंवा सौंदर्य उत्पादनांच्या वस्तू असो. आरोग्य तज्ज्ञांनुसार प्रत्येक वस्तूला एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेटनंतर त्या वस्तूमुळे आपलं नुकसान होऊ शकतं. पण तुम्ही कधी उशा, गादी अगदी स्वयंपाकाघरातील भांडी कधी पर्यंत वापरायला हवे याचा विचार केला आहे का? पूर्वीच्या काळात उन्हाळा आला की गादी, उशा आणि चादर, ब्लँकेट गच्चीवर उन्हात वाळवतो. अजून एक गोष्ट म्हणजे त्या काळात कापसाची उशी आणि गादी असायची. ही उशी आणि गादी काही वर्षांतून त्यातील कापूस आणि कापड बदलून नवीन तयार केली जायची. पण आज कापसाची गादी आणि उशी वापली जात नाही. (Sleeping on the same mattress for years Then wait find out how often mattresses and pillows should be changed)

अशात मग ही गादी आणि उशी कधीपर्यंत वापरायला हवी? शिवाय किचन आणि बाथरुमसारख्या भागात बॅक्टेरियाचं प्रमाण सर्वाधिक अधिक असतं. त्यामुळे याचा परिणाम आपल्या घरातील वस्तूंवर होतो. वर्षांनुवर्षे धूळ आणि बॅक्टेरिया आपल्या घरातील वस्तूंवर साचला जातो. ज्यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा स्थितीत घरातील प्रत्येक गोष्टींचा वापर कधी पर्यंत कराला हवा ते जाणून घ्या. 

लाकड्याचे डबे

आज काल स्वयंपाक घरात लाकड्याचे डबे पाहिला मिळतात. बाबूंपासून हे डब्बे तयार करण्यात येतात. हे डब्बे किचनची शोभा वाढवत असले तरी तज्ज्ञांनुसार  2 ते 3 वर्षांनी हे बदले पाहिजे. कारण काही वेळानंतर या डब्ब्यांना बुरशी आणि ओलाव्याच्या संपर्कात आल्यामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढतो. अशा डब्ब्यातील पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होतो. 

डिश साफ करणारे स्पंज

भांडी साफ करणाऱ्या स्पंजमध्ये बॅक्टेरिया सर्वात वेगाने वाढ होत असते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे स्पंजमधील जंतू नष्ट करण्यासाठी दररोज 1 मिनिट ओलसर स्पंज मायक्रोवेव्ह करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्याशिवाय तर 1 ते 2 आठवड्यांनी स्पंज बदल करायला पाहिजे. 

कटिंग बोर्ड

आजकाल प्रत्येक घरात कटिंग बोर्ड वापरला जातो. हा कटिंग बोर्ड दर एक ते दीड वर्षांनी बदलण्याची गरज असते असं तज्ज्ञ सांगतात. त्याशिवाय कच्चे मांस, कोंबडी आणि भाज्यांसाठी वेगळी कटिंग बोर्ड आणि चाकू असावेत. 

नॉन-स्टिक पॅन

नॉन-स्टिक कोटिंग्ज आज घरोघरी आहे. ही भांडी काही वेळानंतर खराब व्हायला लागतात. त्यामुळे ही भांडी उच्च दर्जाची असावी आणि दर  3 ते 5 वर्षांनी ती बदल करावीत. 

उशी आणि गादी 

उशी आणि गादी यामध्ये मृत त्वचेच्या पेशी, धूळ कण आणि घामाचे कण वर्षांनुवर्ष जमा होत असतात. ज्यामुळे ऍलर्जी आणि श्वसन समस्यांचा धोका वाढतो. अशा स्थितीत उशीचे कव्हर वेळोवेळी धुवावे. तसंच कोणतीही एक उशी 1 ते 2 वर्षांसाठीच वापरा. तर गादी 7 ते 10 वर्षांनी नव्याने बनवावी. गाद्यांना वेळेवेळी उन्ह दाखवावे. गादींला कापडी कव्हर वापरावे. 

कार्पेट

कार्पेट्स स्वतःमध्ये धूळ आणि घाण देखील गोळा करत असतो. त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी, व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने दररोज कार्पेट स्वच्छ करा आणि दर 8 ते 10 वर्षांनी ते नवीन घ्या. 

Read More