Marathi News> Lifestyle
Advertisement

सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी

सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

Nita Ambani's Special Morning Drink : अंबानी कुटुंब हे सतत त्यांच्या लग्झरीयस लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यात वयाच्या 60 व्या वर्षी नीता अंबानी यांचा फीटनेस आणि सुंदरता पाहून नेहमीच सगळ्यांना आश्चर्य होतं. या वयात फिटनेस जसा आहे तसा ठेवणं काही सोपं नाही. पण तुम्हाला माहितीये का की नीता अंबानी यांचा फिटनेस नक्की कसा आहे. ज्यामुळे वयाच्या 60 व्या वर्षी त्या 10 वर्ष लहान दिसतात. त्याविषयी आज आपण जाणून घेऊया...

साधारण आहार

नीता अंबानी यांच्या सुंदरतेविषयी काही बोलण्याची गरज नाही. वयाच्या 60 ठीत ही त्यांची सुंदरता ही तरुणींना लाजवेल अशी आहे. वयाच्या 60 ठीत त्यांच्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो आहे. त्यासाठी या वयातही त्या त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतात. मग तुम्हाला वाटत असेल की त्यासाठी त्या खूप जास्त मेहनत घेत असतील. पण तसं नसून त्या एगदी सर्वसाधारण रुटीन फॉलो करतात. त्या घरचंच जेवण करतात. हेल्दी आणि बॅलेन्स्ड डायट त्या फॉलो करतात. त्यांच्या आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश आहे. सूप, हिरव्या पालेभाज्या, बीटचा ज्यूस आणि त्यांचे काही आवडत्या डिश आहेत. त्यांना डाळ-चपाती खायला खूप आवडतं. 

दिवसभरात खूप पाणी पितात

स्वत: ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभरात नीता अंबानी या खूप पाणी पितात. इतकंच नाही तर त्याचा थेट परिणाम हा त्यांच्या त्वचेवर होतो. त्यांच्या त्वचेवर तो ग्लो दिसून येतो. नीता अंबानी या डायटसोबत रोज न चुकता वर्कआऊट करतात. जिम जाण्यासोबतच त्या योगा करणं, शास्त्रीय नृत्य आणि पोहण्याचा सराव करतात. फक्त नीता अंबानी नाही तर मुकेश अंबानी देखील घरचं जेवणं करण्यास पसंती देतात. 

हेही वाचा : 'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!

नीता अंबानी त्यांच्या दिवसाची सुरुवात ही गरम पाण्यानं करतात. गरम पाण्यात लिंबूचा रस टाकून त्या हे पाणी पितात. त्याचं कारण म्हणजे गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यानं तुमची बॉडी ही डिटॉक्स होते. त्यासोबतच तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. लिंबात व्हिटामिन सी असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य हे चांगलं राहतं आणि तुम्ही सुंदर दिसता. 

Read More