Marathi News> Lifestyle
Advertisement

याला म्हणतात पर्सनल आणि प्रोफेश्नल बॅलेन्स! कोहलीसारखा 'फेव्हरेट बाबा' होण्यासाठी 'विराट' बदल नकोच; फक्त इतकं करा

Virat Kohli Viedo : विराट कोहली कायमच त्याच्या खासगी आणि करिअर क्षेत्रामुळे चर्चेत राहिला. कोहली कायमच खेळ आणि त्याचं कुटूंब यामध्ये सुवर्णमध्य साधताना दिसत आहे. विराट कोहलीने अनेकदा आपल्या कृतीतून पालकांना र्सनल आणि प्रोफेश्नल लाईफमध्ये कसे बॅलेन्स करावे हे शिकवलं आहे. 

याला म्हणतात पर्सनल आणि प्रोफेश्नल बॅलेन्स! कोहलीसारखा 'फेव्हरेट बाबा' होण्यासाठी 'विराट' बदल नकोच; फक्त इतकं करा

Virat Kohli Parenting Tips : विराट कोहलीने सोमवारी पंजाब किंग्सविरुद्ध सामना खेळून आपल्या सर्वोत्कृष्ठ फलंदाजीचं दर्शन घडवलं. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा सामना चिन्नास्वामी स्टेडिअमध्ये संघाला विजय मिळवून दिला. 49 चेंडूमध्ये 77 धावा केल्या ज्यामध्ये चौक्के आणि 2 षटकार लगावले. सामना जिंकल्यानंतर, क्रिकेटर मैदानातून व्हिडिओ कॉलवर पत्नी अनुष्का शर्मा आणि मुले वामिका आणि अकाय यांच्याशी बोलतांना दिसला. विराटचा हा व्हिडीओ अतिशय खास होता. पण यावेळी विराटने आपली हुशारी दाखवली कारण त्याने मोठ्या स्क्रीनवर कॅमेऱ्याची बाजू ठेवली. ज्यामुळे ग्राउंड कॅमेऱ्याला व्हिडीओ कॉलवरील कुटुंबाचा फोटो टिपता आला नाही. एवढंच नव्हे तर कॉल दरम्यान विराट आपल्या मुलांसाठी काही गोंडस चेहरे बनवताना दिसला.

विराटने आपल्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रिया सर्वत्र येत आहेत. यावरुन हे अधोरेखित होतं की, विराट कोहली आपली पर्सनल आणि प्रोफेश्नल लाईफ अतिशय उत्तमप्रमाणे बॅलेन्स करत आहे. कारण अकायच्या जन्मानंतर विराट कोहली पहिल्यांदा घरापासून दूर असून मैदानावर उतरला आहे. 

विराट कोहलीचा 'तो' व्हिडीओ

सुवर्णमध्य महत्वाचा 

विराट कोहली कायमच आपलं घर आणि काम यामध्ये सुवर्णमध्य साधताना दिसतो. क्रिकेट क्षेत्रात यशाच्या शिखरावर असणारा कोहली आपल्या कुटुंबियांना देखील तितकाच वेळ देतो. विराटने त्यांचं हे वागणं अगदी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केलं तेव्हापासून अधोरेखित होत आहे. मग अनुष्कासोबतच खास क्षण असो किंवा वामिका आणि अकाय यांचा जन्म. विराटने कायमच कुटुंबाला महत्त्व दिलं आहे. 
अनेकदा पालक आपल्या कामाला इतकं महत्त्व देतात की, मुलांचा जन्म, त्यांचे वाढदिवस कामाच्या ओझ्याखाली दाबून टाकतात. पण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, मुलांचे हे क्षण पुन्हा अनुभवता येणं कठीण आहे. यामुळे सुवर्णमध्ये साधणे गरजेचे आहे. 

खासगी आयुष्य पहिलं येतं 

विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या दोन टेस्ट मॅचमध्ये नव्हता. त्यावेळी माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी विराटचे समर्थन करत म्हटले होते की, खासगी आयुष्यात सगळ्यात अगोदर येतं. गेल्या 15 वर्षांपासून कोहली खेळत आहे. त्यामुळे आता खेळापासून थोडं दूर राहून कुटुंबासोबत राहण्यासाठी अशा ब्रेकची गरज असते. हीच गोष्ट अनेकदा पालकांनी शिकायला हवी. आज दोघे पालक कामाला जातात अशावेळी मुलांना वेळ देणं जमत नाही. अशावेळी पालकांनी कामातून थोडा ब्रेक घेणे गरजेचे आहे.

काम हे आयुष्याचा एक भाग

सोमवारी झालेल्या सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी विराटशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, सामन्यानंतर मी विराटशी संवाद साधला. तो अतिशय शांत, आरामदायी दिसत होता. विराटशी संवाद साधून खूपच छान वाटलं. संवाद साधल्यावर विराट खेळाबद्दल नाही तर त्याच्या दोन महिन्यातील खासगी आयुष्यातील बदलाबद्दल बोलत होता. त्यामुळे आपलं काम हे आयुष्याचा एक भाग आहे, हे लक्षात आलं. हर्षा भोगले यांनी विराटची अधोरेखित केलेली ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. 

Read More