Marathi News> Lifestyle
Advertisement

घरातील भांडणात माघार कुणी घ्यावी? प्रल्हाद पै सांगतात

Relationship Tips :  वाद हा प्रत्येक नात्यात होत असतो. पण या वादात माघार नेमकी कुणी घ्यायची? प्रल्हाद पै यांनी सांगितले भांडणाचे काही नियम जाणून घ्या. 

घरातील भांडणात माघार कुणी घ्यावी? प्रल्हाद पै सांगतात

Pralhad Pai Relationship Tips :  नातं म्हटलं की तेथे वाद हा आलाच. असं म्हटलं जातं की, भांडणानेच प्रेम वाढतं. पण भांडणात माघार कुणी घ्यायची. हा प्रश्न पडतोच? पुन्हा प्रल्हाद वामनराव पै सांगतात की, भांडणाचे ही काही नियम असतात. त्या नियमांनी भांडल तर वाद विकोपाला जात नाही. सद्गुरु वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या 'जीवनविद्या मिशन' द्वारे जीवन जगण्याची कला शिकवली जाते. आपण अनेकदा छोट्या छोट्या भांडणात आपलं नातं गमावून बसतो. ही चूक होऊ नये म्हणून भांडणात माघार कुणी घ्यायची आणि भांडणाचे नियम काय याबाबत प्रल्हाद वामनराव पै यांनी सांगितल्या खास टिप्स. 

तुम्ही अशा पद्धतीने एखादी परिस्थिती सांभाळली तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला तुमच्या नातेसंबंध, रिलेशनशिप सुधारण्यासाठी होईल यात शंकाच नाही. 

माघार कुणी घ्यायची?

माघार कुणी घ्यायची हा वादातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. वाद होत असताना त्यामध्ये अहंकार अनेकदा आढवा येतो आणि वाद क्षमण्याचं नाव घेत नाही. वाद कुणामधला ही असू द्या दोघे वाट बघत असतात की, माघार घेणार कोण? तर यावर प्रल्हाद वामनराव पै सांगतात, ज्याला सुख हवं त्याने पुढे येऊन माघार घ्यावी.  

भांडायच किती 

घरामध्ये घर घर ही सुरुच असतं. भांडण विकोपाला जाईपर्यंत वाद होतो. भावा-भावाची भांडण, नवरा-बायकोची भांडण, सासू-सुनेची भांडणं. अशावेळी भांडायच किती? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. एखादी चर्चा करुन, गैरसमज दूर करुन वाद टाळता येऊ शकत असेल तर तो टाळणे गरजेचे आहे. कारण भांडायची किती आणि कुणाकुणाशी यावर मर्यादा हवी. 

भांडणाची एक्सपायरी डेट महत्त्वाची 

प्रल्हाद पै सांगतात की, भांडण्याची एक्सपायरी डेट हवी. कारण भांडण ताणल्यावर ते सोडवणे कठीण होते. आणि सोडवायचे झालेच तर त्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची गरज भासू शकते. अशावेळी भांडण हे त्याच रात्री संपवणे गरजेचे आहे. हीच आहे भांडणाची एक्सपायरी डेट. 

मुलांसमोर भांडायचं नाही 

वाद होत असताना काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत. म्हणजे एक्सपायरी डेट महत्त्वाची तसेच तो वाद मुलांसमोर न करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण पालकांचा वाद किंवा इतर कुटुंबातील व्यक्तींच्या भांडणाचा परिणाम हा मुलांवर होत असतो. हा वाद टाळा. 

भांडणाचा विषय बदलू नका 

आपल्यापैकी अनेकांना अनुभव असतो की, वाद करताना, भांडताना तो विषय कुठच्या कुठे निघून जातो. वादाचा विषय एक असतो पण तो कालांतराने वेगळ्याच विषयावर जातो. असं अजिबात करु नका. किंवा वाद करताना एकमेकांच्या कुटुंबाचा खास करुन पालकांचा उल्लेख अजिबात करु नका. 

सहनशक्तीचा वापर करा 

वाद झाल्यावर आपल्यामध्ये असलेल्या सहनशक्तीचा वापर करा. कुठे थांबायचं हे कळणं आवश्यक आहे. पण कुणी थांबायचं हा विचार करु नका. कारण वाद होत असताना ज्याला सुखं हवंय त्याने माघार घ्यावी हा विचार नक्की करा. शेवटला काय म्हणावं Agree to disagree असं म्हणून वाद थांबवा. 

Read More