Marathi News> Lifestyle
Advertisement

प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवलेलं जेवण बनू शकतं विष, खरेदी करताना 'हा' नंबर जरुर पाहा

प्लास्टिकच्या डब्यांचा वापर काळानुरूप वाढत आहे. यात काही चुकीचं नाही.पण चुकीच्या पद्धतीने वापरल्याने आरोग्याला हानी पोहोचते. डब्बा खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. 

प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवलेलं जेवण बनू शकतं विष, खरेदी करताना 'हा' नंबर जरुर पाहा

आताचं आयुष्य बदलत चाललं आहे. लोकं हल्ली घरी कमी आणि कामाच्या ठिकाणी बराचवेळ देतात. अशावेळी जेवण, अन्न नेण्यासाठी डब्ब्यांचा वापर केला जातो. अगदी घराघरांमध्येही उरलेलं अन्न किंवा सुका खावू ठेवण्यासाठी पदार्थ डब्ब्यात काढून ठेवले जातात. अशावेळी डब्ब्यांची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. 

प्लास्टिकच्या गैरवापरामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे जीवघेणे आजारही होऊ शकतात. प्लास्टिकच्या कंटेनरचा दर्जा राखण्यासाठी नंबर कोड दिले आहेत. त्यांच्या मदतीने, आपण जाणून घेऊ शकता की, कोणत्या कंटेनरची गुणवत्ता अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण कोड्ससोबत प्लास्टिकच्या वापरासंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.

नंबर महत्त्वाचा 

प्लास्टिकच्या डब्ब्याच्या मागे नंबर लिहिलेला असतो, जो अतिशय महत्त्वाचा असतो. हा रिसायकलिंग क्रमांक आहे, म्हणजेच त्यामधून बॉक्सची गुणवत्ता दर्शवितो. कोणत्याही बॉक्सवर 3, 6 किंवा 7 क्रमांक लिहिलेला असेल तर तो अतिशय काळजीपूर्वक वापरावा. कारण गरम केल्यावर ते हानिकारक पदार्थ सोडतात.

एकदाच वापरावे असे डब्बे 

अन्न आणि पेयांसाठी प्लास्टिकचे कंटेनर खरेदी करण्यापूर्वी नंबरकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. जर बॉक्सच्या मागील बाजूस त्रिकोणी आकारात 1 लिहिले असेल तर याचा अर्थ असा की, तो एकदाच वापरायचा आहे. एकापेक्षा जास्त वेळा वापरल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

रियुझेबल डब्ब्यांची ओळख

घरात प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कधी-कधी गरज पडते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला प्लॅस्टिकचे डबे पुनर्वापरासाठी घ्यायचे असतील तर त्या पेटीकडे लक्ष द्या ज्याच्या मागे 2,4,5 असे लिहिलेले आहे. हा क्रमांक असलेले प्लास्टिकचे कंटेनर पुन्हा पुन्हा वापरता येतात. हे आरोग्यास हानी पोहोचवत नाहीत.

फ्रीज आणि स्टोरेजकरिता डब्बे 

तुम्ही फ्रीजरमध्ये वापरण्यासाठी प्लास्टिकचे बॉक्स विकत घेत असाल तर कंटेनरवर फ्रीजर सेफ लिहिलेले आहे का ते काळजीपूर्वक तपासा. याशिवाय ज्या बॉक्सच्या पाठीवर कप आणि काट्याच्या खुणा असतात त्या पेट्यांचा वापर अन्न साठवण्यासाठी करता येतो.

मायक्रोवेवकरिता प्लेट 

जर तुम्हाला मायक्रोवेव्हसाठी भांडी घ्यायची असेल तर ज्याच्या खाली तरंगाचे चिन्ह असेल तेच खरेदी करा. कारण या खुणा सूचित करतात की, बॉक्स मायक्रोवेव्ह सुरक्षित आहे. याशिवाय डब्यावर पाण्याचा आकार असेल तर ते भांडे 'डिशवॉशर' सुरक्षित असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे तुम्ही ते डिश वॉशरसाठी खरेदी करू शकता.

Read More