Marathi News> Lifestyle
Advertisement

वजन कमी करण्यासाठी पावसाळा बेस्ट सीझन, झरझर कमी होईल फॅट; कसं ते समजून घ्या!

Weight Loss In Monsoon: मान्सून म्हणजेच पावसाळा हा वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट काळ आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना कसं ते जाणून घेऊया.   

 वजन कमी करण्यासाठी पावसाळा बेस्ट सीझन, झरझर कमी होईल फॅट; कसं ते समजून घ्या!

Weight Loss In Monsoon: वजन कमी करायचे म्हणजे खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. व्यायाम, आहार आणि मुख्य म्हणजे खाण्यावर नियंत्रण पण तुम्हाला माहितीये का पावसाळ्याचा काळ हा वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कसं ते जाणून घेऊया. 

वजन कमी करण्यासाठी व्यायाम, रोज धावणे, संतुलित आहार हे सर्व प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही त्याने काहीच फरक पडत नाही. पण तुम्हाला माहितीये का पावसाळा हा वजन कमी करण्यासाठी उत्तम संधी आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त या टिप्सचा अवलंब करावा लागेल.सुशील धनवाड यांच्या मिरॅकलमिस्ट्री या इन्स्टाग्राम अकाउंटवर संतुलित आहार आणि व्यायाम यासंबंधी काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. वजन कमी करण्यासाठी पावसाळा ही उत्तम संधी तर आहेत पण निरोगी जीवनशैलीसाठीदेखील उपयुक्त आहे. 

- पावसाळ्यात वातावरण थंड असते. त्यामुळं गरम कमी होते. अशावेळी तुम्ही जास्तीत जास्त वर्कआउट करु शकता. त्यासाठी जिममध्ये जाण्याचीही गरज नसते. घरच्या घरी तुम्ही अर्धातास, स्ट्रेचिंग, High-intensity interval training करु शकता. तुम्ही घरच्या घरी दोरी-उड्यादेखील मारु शकता. 

- पावसाळ्यात क्रेव्हिंग कमी असते. म्हणजे सतत खावंस वाटण्याची इच्छा कमी होते. त्यामुळं तुमचं नियंत्रण राहते. त्याचबरोबर पाण्याची लेव्हलदेखील नॉर्मल असते. तुम्ही हायड्रेट असता. त्यामुळं तुमची तुमची चयापचय क्रिया वाढवण्यास मदत होते. 

- पावसाळ्यात खूप चांगली झोप येते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे. कारण ते शरीराच्या रिकव्हरीसाठी खूप फायदेशीर आहे. दररोज 7-8 तास झोप घ्या. पुरेशी झोप घेतल्याने तुमची भूक नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.

- पावसाळ्यात तणाव कमी होतो. कारण पावसाळ्यात बाहेर वातावरण छान असते त्यामुळं स्ट्रेस कमी होतो. त्याचा नकळत परिणाम तुमच्या वेटलॉसच्या प्रोसेसवरही होत असतो. कारण अतितणावामुळंही वजन वाढू शकते.

वजन कमी करण्यासाठी हे मुद्दे महत्त्वाचे 

वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच संतुलित आहार असणेही गरजेचे आहे. वजन कमी करणे म्हणजे कमी खाणे असे होत नाही. वेटलॉससाठी भरपेट आणि पौष्टिक नाश्ता करणे खूप गरजेचे आहे. पौष्टिक नाश्ता केल्यास दिवसभराची उर्जा मिळते त्यामुळं तुमची भुक नियंत्रणात राहते व सतत खाण्यापासून तुम्हाला रोखते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More