Marathi News> Lifestyle
Advertisement

झाशीच्या राणीचं खरं नाव काय? मुलींमध्ये हवे असतील शौर्यसमान गुण तर ठेवा 'ही' नावे

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावांवरुन ठेवा मुलींना नावे. त्यांच्यात दिसतील सकारात्मक गुण. 

झाशीच्या राणीचं खरं नाव काय? मुलींमध्ये हवे असतील शौर्यसमान गुण तर ठेवा 'ही' नावे

राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथी. त्यांना झाशीची राणी म्हणून संबोधलं जातं. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसीतील एका मराठी कऱ्हाडे ब्राम्हण कुटुंबात झाला. वडीलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथी बाई असे होते. त्यांच्या घरी राणी लक्ष्मीबाई म्हणजे झाशीच्या राणीच्या जन्म झाला. पण त्यांचं खरं नाव काय? तसेच झाशीच्या राणीप्रमाणेच तुमच्या मुलीमध्ये गुण असावेत असं वाटतं असेल तर खालील नावांचा विचार करा. 

झाशीच्या राणीचे खरे नाव

राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव मणिकर्णिका तांबे. मणिकर्णिका या नावाचा अर्थ आहे रत्नजडीत, आकाशाची मुलगी. 

या नावानेही ओळखलं जायचं? 

मणिकर्णिका यांना मनु आणि छबीली या दोन नावांनी देखील प्रेमाने हाक मारत असतं. 
मनु - विचार, संस्कृतमध्ये याचा अर्थ आहे शहाणे. 

छबीली - छबीली या नावाचा अर्थ आहे सुंदर स्त्री. जर तुम्ही मुलींसाठी सुंदर नावे शोधत असाल तर वरील नावांचा नक्की विचार करा. 

लग्नानंतरचं नाव 

मनु यांचा विवाह वयाच्या 14 व्या वर्षी झाशीचे महाराज गंगाधर राव नेवलकर यांच्याशी झालं. मणिकर्णिका म्हणजे झाशीच्या राणीचं नाव लग्नानंतर राणी लक्ष्मीबाई असं ठेवण्यात आलं. लग्नाच्या दिवशी त्यांचं नाव राणी लक्ष्मीबाई असं ठेवण्यात आलं. 

राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणेच इतर स्वातंत्र्यसेनानी महिलांची नावे आणि अर्थ 

नीरा आर्य 
देशाला अभिमान वाटावा म्हणून नीरा आर्यने तिचे स्तनही कापले. तिच्याबद्दल असे म्हटले जाते की सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवण्यासाठी तिने आपल्या पतीचाही खून केला होता आणि ती सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याची पहिली महिला गुप्तहेर होती. त्यामुळे मुलीसाठी 'नीरा' या नावाचा देखील विचार करु शकता. 

सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू, ज्यांना 'भारतीय स्वातंत्र्य लढ्याची नायिका' म्हटले जाते, त्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. सरोजिनी नायडू या १९२५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनात पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा होत्या. 1928 मध्ये त्या गांधीजींकडून अहिंसा चळवळीचा संदेश घेऊन अमेरिकेत आल्या.

कमला नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तसेच सामाजिक सुधारणा आणि महिलांसाठी कार्यात योगदान दिले.

तुम्ही तुमच्या मुलींसाठी वरील नावांचा नक्कीच विचार करु शकता. कारण या नावांमध्ये दडलंय वेगळेपण. 

Read More