Marathi News> Lifestyle
Advertisement

सतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी

Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे

सतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी
Updated: Dec 28, 2023, 08:00 AM IST

Key of success : आपल्या सगळ्यांचं लहानपणापासून एकच स्वप्न असतं की आपल्याला मोठं होऊन यशस्वी व्हायचं आहे. त्यासाठी अनेक गोष्टी आपण करतो. वेगवेगळ्या गोष्टी शिकतो त्यातून काय नवीन करता येईल याचा विचार देखील करतो. पण असं देखील अनेकदा होतं की आपल्याला वाटतं की मी इतकं करूनही मी यशस्वी का होत नाही. मला यशस्वी होण्यापासून कोणती गोष्ट रोखते. त्यामागे काय कारण असतात आज आपण ते जाणून घेऊया.

यश मिळवण्यासाठी चांगले विचार आणि सवयी अंगीकारल्या पाहिजेत.

आपले विचार आणि सवयी आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. हे फक्त बोलण्यापूर्ती मर्यादीत नाही, तर हे सत्य आहे. आपण जो विचार करतो ते सगळं आपल्या आयुष्यात घडू लागतं. त्यामुळे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर नकारात्मक गोष्टींपासून दूर राहून तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवा.

1. कम्फर्ट झोनमध्ये राहणे
यश मिळवण्यासाठी तुम्हाला आळस सोडावा लागेल. लक्षात ठेवा की विश्रांती करत राहिलात तर तुम्ही यशस्वी होणार नाही. कारण जेव्हा तुम्ही मेहनत करण्याऐवजी आरामात जगण्याचा विचार कराल तेव्हा तुमचं करिअर किंवा ज्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ते तिथेच रहाल. 

२. अपयशाची भीती
कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण आपण यशस्वी होत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की हे काय आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतोय. पण ही गोष्ट ही चांगली आहे असं म्हणत तुम्ही अपयशाकडे पाहा. त्यामुळे अपयशाच्या भीतीने प्रयत्न करणे सोडू नका. या भीतीवरच मात करूनच खरे यश मिळू शकते.

३. यश मिळवण्यासाठी दुसऱ्याचा मार्ग निवडू नका
अनेकवेळा असं होतं की आपणं पाहतो की आपण ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहोत त्यानं आपण यशस्वी होत नाही. मग दुसऱ्या यशस्वी व्यक्तीनं काय केलं तो कसा यशस्वी झाला तेच फॉलो करू नका. कारण प्रत्येत व्यक्तीची यशाची व्याख्या ही वेगळी आहे. 

४. स्वतःशी प्रामाणिक नसणे
आपण स्वतःशी प्रामाणिक रहायला हवे हे सगळ्यात आधी आपण शिकले पाहिजे की. स्वत:साठी कोणताही निर्णय घेताना किंवा योजना करताना, तुमच्या मनासला काय वाटते ते ऐका. कधीकधी कोणी दुसरी व्यक्ती बोलते किंवा त्याच्या दबावाखाली काही करू नका.

५. कठोर परिश्रम करणे
यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही काम करताना पूर्ण मेहनत करता तेव्हा त्यातून चांगलंच काही बाहेर पडतं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)