Marathi News> Lifestyle
Advertisement

व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास रात्री दिसतात 5 लक्षण, दुर्लक्ष केल्यास वाढेल समस्या

व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन बी12 खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरात तयार होत नाही तुम्ही ज्या अन्नाचे सेवन करता त्यातूनच तुम्हाला प्राप्त होते. 

व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास रात्री दिसतात 5 लक्षण, दुर्लक्ष केल्यास वाढेल समस्या

शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जवळपास सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. जर कोणत्या व्हिटॅमिन आणि मिनिरलची कमतरता झाल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. या व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन बी12 खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरात तयार होत नाही तुम्ही ज्या अन्नाचे सेवन करता त्यातूनच तुम्हाला प्राप्त होते. शरीरात व्हिटॅमिन  बी12 रेड ब्लड सेल्स, सेल मेटाबोलिज्म आणि डीएनए बनवणे अशा अनेक कामांसाठी उपयुक्त ठरते. व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवू लागल्या रात्री शरीरात काही लक्षण जाणवू लागतात. 

स्नायूत पेटके येणे : 

fallbacks

शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता झाल्यावर स्नायूंमध्ये पेटके येण्याची समस्या जाणवते. रात्री अंथरुणावर झोपल्यावर स्नायूत पेटके येऊ लागतात. याचा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे अवयव कमकुवत होतात. 

गॅस्ट्रोइंटेस्टायनलची समस्या : 

fallbacks

शरीरात व्हिटॅमिन बी12 ची समस्या झाल्यावर रात्रीच्यावेळी गॅस्ट्रोइंटेस्टायनलची समस्या होऊ शकते. यामुळे मळमळ, अतिसार, गॅस, ऍसिडिटी, सूज येणे, कब्ज सारखी गॅस्ट्रोइंटेस्टायनलची लक्षण जाणवू शकतात. 

त्वचा पिवळी पडणे : 

fallbacks

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे एनीमियाची समस्या होऊ शकते आणि प्रिमॅच्युअर ब्लड सेल्समुळे त्वचा पिवळी दिसू लागते. अशाप्रकारची लक्षण जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.  

हेही वाचा : हाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरू शकतात 'या' 5 भाज्या, 15 दिवस सेवन केल्यास निघून जातील नसांमधील फॅट्स

 

डोकंदुखी : 

fallbacks

शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता झाल्याने मायग्रेनची समस्या होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या जाणवते. यामुळे रात्री नीट झोप लागत नाही. रात्रीच्यावेळी अशी लक्षण लाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार सुरु करा. 

खूप थकवा येणे : 

fallbacks

शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता झाल्याने रेड ब्लड सेल्सचं उत्पादन प्रभावित होतं. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊन थकवा येतो. हा थकवा रात्री जास्त जाणवू लागतो. 

Read More