Marathi News> Lifestyle
Advertisement

How To Reduce AC Bill : उन्हाळ्यात एसीचा वापर केल्याने भरमसाठ बिल येतं? 5 पद्धतीने राहिल आटोक्यात

Tech Tips: अनेकदा लोक एसीमुळे बिल जास्त येऊ नये म्हणून 2 स्टार किंवा 3 स्टार एसी खरेदी करतात. जुन्या मॉडेलचा एसी खरेदी केल्याने विजेचा वापरही जास्त होतो. अशा परिस्थितीत वीज बिलही जास्त येते. 

How To Reduce AC Bill : उन्हाळ्यात एसीचा वापर केल्याने भरमसाठ बिल येतं? 5 पद्धतीने राहिल आटोक्यात

How to Save Your AC Bill: उष्मा आणि आर्द्रतेपासून वाचण्यासाठी लोक आता एसी आणि कुलरची मदत घेतात. मात्र लोक एसी आणि कुलर वापरत असल्याने त्यानुसार वीज बिल भरावे लागते. त्यामुळे काही वेळा वीज बिलही वाढते आणि मासिक बजेट बिघडते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे वीज बिल कमी आणि आटोक्यात येण्यासाठी या 5 पद्धतीचा वापर करा. कडक उन्हापासून आराम मिळवा तेही कमी विज बिलात. 

अनेकदा लोक एसीमुळे विजेचं बील कमी यावं यासाठी  2 स्टार किंवा 3 स्टार एसी खरेदी करतात. जुन्या मॉडेलचा एसी खरेदी केल्याने विजेचा वापरही लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत वीज बिलही जास्त येते. जर तुम्हाला एसी घ्यायचा असेल तर फक्त ब्रँडचा किंवा 5 स्टार एसी घ्या.

योग्य तापमान आवश्यक 

योग्य तापमानात एसी चालवल्यास विजेच्या बिलात नक्कीच बचत होईल. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) नुसार, आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम तापमान 24 अंश सेल्सिअस आहे. या तापमानात एसी वापरल्यास तुमचे बिल नक्कीच कमी होईल. अनेक वेळा लोक एसीचे तापमान कमी करून झोपतात, ज्यामुळे वीज बिल जास्त येते आणि शरीराला खूप नुकसानही होते.

मेन स्वीच बंद करा

अनेक वेळा लोक एसी बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करतात. पण मेन स्वीच बंद करायला विसरून जा. अशावेळी, फक्त एसी बंद करून चालणार नाही, पण मेन स्विचही बंद करावा लागेल, नाहीतर प्रचंड वीज बिल येऊ शकते.कारण रिमोटने कितीही एसी बंद केला तरी मेन स्विचमधून विज चालूच असते. 

वेळ देखील वापरा

जर तुम्ही रात्री एसी वापरत असाल तर तुम्ही टायमर देखील वापरू शकता. यामुळे तुमचा एसी निर्धारित वेळेनंतर आपोआप बंद होईल. यामुळे तुमचे वीज बिलही कमी होईल. अनेकदा एसी चालू ठेवून दरवाजा उघड-झाप केली जाते. यामुळे एसीचा हवा तसा वापर येत नाही पण विजेचं बिल मात्र वाढतंच जाते. त्यामुळे एसी वापराताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. 

खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा

एसी चालवताना हेही लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या खोलीत एसी चालवत आहात त्या खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद असले पाहिजेत. यामुळे तुमच्या घराला पुरेसा कूलिंग मिळेल आणि कूलिंगसाठी जास्त वेळ एसी चालवावा लागणार नाही. तसेच लहान मुलांना घेऊन झोपत असाल तर त्यांना सतत रुममधून बाहेर ये-जा करायला देऊ नका. कारण यामुळे देखील विजेचं बिल अधिक येतं. 

वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्या

एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग व्हायला हवी हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे वीज बिल कमी होईल. त्यामुळे अगदी मार्च महिन्यातच एसची सर्व्हिसिंग करुन घेणं फायदेशीर ठरेल. 

Read More