Marathi News> भारत
Advertisement

जादूटोण्याचा संशयावरुन मायलेकींना भरवले मानवी शौच, टक्कलही केलं

रांचीच्या सोनाहाटू पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या दुलमी गावात महिला आणि तिच्या मुलीला मानवी शौच खायला सांगण्याचा संतापजनक प्रकार समोर आलायं. जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी पीडितेवर हे अत्याचार केलेयत. एवढ्यावरच न थांबता दोघींना केस कापायला भाग पाडल्याचेही तिने सांगितले. 

जादूटोण्याचा संशयावरुन मायलेकींना भरवले मानवी शौच, टक्कलही केलं

झारखंड : रांचीच्या सोनाहाटू पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या दुलमी गावात महिला आणि तिच्या मुलीला मानवी शौच खायला सांगण्याचा संतापजनक प्रकार समोर आलायं. जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी पीडितेवर हे अत्याचार केलेयत. एवढ्यावरच न थांबता दोघींना केस कापायला भाग पाडल्याचेही तिने सांगितले. 

'मानवी शौच खायला दिले'

१६ फेब्रुवारीला ही घटना घडली. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या दोघींना घरातून खेचत बाहेर काढले आणि मानवी शौच खाण्यास जबरदस्ती केल्याचे  एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. दोघींचे केस कापण्यात आले. 
 
याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून कारवाईला सुरूवात केलीए. 
 

Read More