Marathi News> भारत
Advertisement

YouTuber Vlog Grandfather Funeral: त्याने केला आजोबांच्या अंत्यसंस्काराचा Vlog; लोकांनी चांगलंच झापलं

YouTuber Vlogs Grandfather Funeral: या तरुणाने पोस्ट केलेल्या व्हॉगमध्ये मृत व्यक्तीचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीही दिसत असून आजोबांच्या अंत्यसंस्कारामध्ये हा तरुण हसत हसत निवांतपणे आलेल्या व्यक्तींची बोलताना दिसतोय.

YouTuber Vlog Grandfather Funeral: त्याने केला आजोबांच्या अंत्यसंस्काराचा Vlog; लोकांनी चांगलंच झापलं

YouTuber Vlogs Grandfather Funeral: युट्यूबवरुन व्हॉग करुन पैसे कमवण्याचा नादात आजकाल प्रत्येक दुसरी तिसरी व्यक्ती युट्यूबर होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र या स्पर्धेमध्ये प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. यश मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. युट्यूबसारख्या माध्यमावर यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. अनेकदा युट्यूबवर व्ह्यूज मिळवण्यासाठी लाज लज्जा सोडून न पटणाऱ्या गोष्टींही कराव्या लागतात असा दावाही केला जातो. असाच काहीसा प्रकार सध्या चर्चेत आहे तो म्हणजे एका युट्यूबरने  पोस्ट केलेला त्याच्या आजोबांच्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओ. या तरुणाने आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्काराचा व्हॉग तयार केला असून तो पोस्ट केल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

कोण आहे या युट्यूबर?

आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओ पोस्ट करणारा हा युट्यूबर आहे लक्ष्य चौधरी (Lakshay Chaudhary). हा उत्तर भारतामधील एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे अनेक युट्यूब चॅनेल्स आहेत. लक्ष्यने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे दिसत आहेत. मात्र यापैकी त्याच्यावर टीका करणाऱ्यांचा गट मोठा असल्याचं पहायला मिळत आहे. लक्ष्यने आजोबांच्या अंतिमसंस्कारामध्ये काय काय घडलं हे चित्रित करुन त्याचा व्हॉग बनवला आहे. मात्र अशा प्रसंगी असा व्हॉग बनवणं लोकांना फारसं पसंत पडलेलं नाही. अनेकांना हा व्हॉग खटला असून त्यांनी यावरुन लक्ष्यवर टीका केली आहे.

fallbacks

थम्बनेल बदललं

लक्ष्यने आपल्या व्हिडीओची थम्बनेल इमेज आणि टायटलही बदललं आहे. डॉ. निमो यादव नावाच्या व्यक्तीने लक्ष्यने पूर्वी ठेवलेली थम्बनेल इमेज आणि टायटलचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

या थम्बनेलमध्ये लक्ष्यचा फोटो दिसत असून नानाजींना शेवटची श्रद्धांजली, असं टायटल या व्हिडीओला देण्यात आलं आहे. ट्विटरवरुन या जुन्या थम्बनेलचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. या जुन्या थम्बनेलमध्ये अंत्यसंस्कारासाठी जमलेले पाहुणेही दिसत आहेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचं निधन झालेलं असताना या व्हॉगमध्ये युट्यूबर मात्र आलेल्या लोकांशी हसत खेळत बोलत असून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. 

fallbacks

अनेकांनी झापलं, म्हणाले पैशांसाठी...

ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या थम्बनेलच्या स्क्रीनशॉटला 2 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करुन याबद्दल आपली प्रतिक्रियाही नोंदवली आहे. एकाने, "व्ह्यूजच्या नादात," असं म्हटलं आहे. तर अन्य एकाने, "पैशांसाठी काय काय करावं लागतं," असा टोला लक्ष्यला लगावला आहे. अन्य लोकांनी लक्ष्यच्याच एका जुन्या व्हिडीओची लिंक शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने मृत व्यक्तींचे व्हिडीओ बनवणाऱ्यांना ट्रोल केलं होतं. अशा प्रसंगी हा व्यक्ती व्हिडीओ बनवू शकतो तर तो व्हिडीओमध्ये आजोबांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून चॅनेल सबस्क्राइब करा असंही म्हणू शकतो, असा टोला अन्य एकाने लगावला आहे.

याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करुन नक्की कळवा.

Read More