Marathi News> भारत
Advertisement

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, मी ईद साजरी करू शकणार नाही..

  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी म्हटले हिंदू असल्याचा मला गर्व होणे यात काही चुकीचे नाही. विधानसभेचे राज्यपालाच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चेवर उत्तर देताना योगी बोलत होते. 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, मी ईद साजरी करू शकणार नाही..

लखनऊ :  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी म्हटले हिंदू असल्याचा मला गर्व होणे यात काही चुकीचे नाही. विधानसभेचे राज्यपालाच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चेवर उत्तर देताना योगी बोलत होते. 

योगी म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारले तुम्ही अयोध्येत दीपोत्सव साजरा केला, होळी मथुरेत... तर ईद कुठे  साजरी करणार.... तर मी सांगितले की मी ईद साजरी करू शकणार नाही. मी माझी संस्कृती आणि परंपरेनुसार ईद नाही मानत. पण शांततापूर्ण कोणी ईद साजरी करत असेल तर सरकार संपूर्ण सहकार्य आणि सुरक्षा देणार आहे. 

भाजप ढोंग करत नाही... 

योगी यांनी सपा आणि बसपासह सर्व विरोधी पक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेत सांगितले की, संधीसाधूप्रमाणे घरात बसून जानवे घालायचे आणि बाहेर जाऊन टोपी घालायची. हे कोणते ढोंग आहे, हे ढोंग भाजप नाही करत. जे आत आहे, तेच बाहेर आहे. 

योगी म्हणाले, हिंदू असल्याने गर्वाची अनुभूती असणे काही चुकीचे नाही. आम्हांला भारताची परंपरा आणि वारसाचा गौरव आहे. तीर्थाटनसोबत पर्यटनाला वाव देण्यासाठी आम्ही याचा उपयोग केला आहे. 

Read More