Marathi News> भारत
Advertisement

I am not Malala म्हणाऱ्या 'याना मीर' यांना एअरपोर्टवर अडवलं, दिल्लीत नेमकं काय झालं? पाहा Video

Yana Mir Stopped At Delhi Airport : 'आयएम नॉट मलाला' म्हणत याना मीर यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं होतं. अशातच आता याना मीर यांचा विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

I am not Malala म्हणाऱ्या 'याना मीर' यांना एअरपोर्टवर अडवलं, दिल्लीत नेमकं काय झालं? पाहा Video

Yana Mir Viral Video : जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या पत्रकार आणि कार्यकर्त्या याना मीर (Yana Mir) यांनी ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना आपली तुलना नोबल पारितोषिक विजेता मलाला यूसुफजईसोबत (Malala Yousafzai) करणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले होते. 'आयएम नॉट मलाला' म्हणत याना यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं होतं. त्यांचं भाषण चांगलंच गाजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती मिळाली होती, त्याचबरोबर त्यांचं कौतूक देखील केलं जात होतं. अशातच आता याना मीर यांचा विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

याना मीर यांना दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एअरपोर्टवर सामनाचं स्कॅनिंग करत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मीर इंग्लंडमधून भारतात आल्यावर दिल्ली एअरपोर्टवर त्यांनी कस्टम अधिकाऱ्यांशी वाद घातला. एका देशभक्ताला अशी वागणूक मिळत आहे, असं मीर व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. माझं सामना सार्वजनिक ठिकाणी का उघडलं जातंय? मला का अडवलं जातंय? असा सवाल करत त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय.

दिल्ली कस्टमने दिलं उत्तर

ल्ली कस्टमच्या अधिकृत पोस्टमध्ये दोन व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये याना मीर स्कॅनिंग मशीनजवळ उभ्या असल्याचं दिसतंय. विशेषाधिकार कायद्याच्या वर नाहीत, याना मीर सामान स्कॅन करताना सहकार्य करत नव्हत्या, असं दिल्ली कस्टमकडून सांगण्यात आलंय.

काय म्हणाल्या होत्या याना मीर?

मी मलाला युसूफझाई नाही, कारण मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्या भारत देशात आणि मातृभूमी असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षित आहे. माझ्या मातृभूमीपासून पळून जाऊन तुमच्या देशात (ब्रिटन) आश्रय घेण्याची मला गरज नाही. मी मलाला युसूफझाई कधीच होणार नाही. पण मलाला युसूफझाईने माझ्या देशाची, माझ्या पुरोगामी मातृभूमीला अत्याचारित म्हणून बदनाम केल्याबद्दल मला आक्षेप आहे, असं म्हणत भारताविरोधात प्रपोगंडा चालवणाऱ्या पाकिस्तानला याना मीर यांनी ब्रिटनच्या संसदेत खडेबोल सुनावले आहेत.

Read More