Marathi News> भारत
Advertisement

शून्याच्या जागी लिहिले ८; ग्राहकाला ४९ हजारचा भुर्दंड

घडलेला प्रकार ही मानवी चूक असल्याचे सांगत न्यायालयानेही प्रकरण निकालात काढले.

शून्याच्या जागी लिहिले ८; ग्राहकाला ४९ हजारचा भुर्दंड

बंगळुरू: खाते क्रमांक चुकीचा लिहिल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या ग्राहकाला चक्क ४९,००० रूपयांचा भुर्दंड बसला आहे. आपली कैफियत घेऊन ग्राहक जेव्हा बँकेत गेला तेव्हा; हे पैसे परत करायला बँकेने नकार दिला. त्यानंतर ग्राहकाने बँकेला ग्राहक न्यायालयातही आव्हान दिले. पण, तिथेही ग्राहकाच्या पदरी निराशाच पडली. या प्रकरणातली घडलेला प्रकार ही मानवी चूक असल्याचे सांगत न्यायालयानेही प्रकरण निकालात काढले.

छोट्या चुकीचा मोठा फटका

दरम्यान, महेंद्र कुमार यमनप्पा यांनी गेल्या वर्षी १८ जुलै २०१७ला कर्नाटकमधली कलबुर्गी येथील कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम)मध्ये जाऊन आपल्या बचत खात्यातून पैसे ट्रान्सफर केले. दोन दिवस झाले तरी खात्यावर रक्कम वळती झाली नव्हती. त्यामुळे यमनप्पाने बँकेच्या कलबुर्गी शाखेत जाऊन चौकशी केली. सुरूवातीला बँकेने कोणताच प्रतिसाद दिला नाही. मग यमनप्पांनी बँकेकडे दुसऱ्यांदा चौकशी केली. तेव्हा ३० ऑगस्टला बँकेकडून त्यांना उत्तर आले. पण, तोपर्यंत यमनप्पांनी पोलिसांत तक्रार दिली होती. महेंद्र यमनप्पाने एसबीआयमध्ये तक्रार केल्यानंतर १४ दिवसांनी (३ ऑगस्ट) तेलंगणमधील अदिलाबाद येथील रहिवासी खान शबाब यांनी आपले कार्ड स्वाईप केले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांना त्यांच्या खात्यावर ४९५०० रूपयांची रक्कम शिल्लख दिसली. त्यांनी सर्व पैसे काढले. 

शून्याच्या जागी लिहिले ८ झाला घोळामुळं

एसबीआयने तक्रारदाराला सांगितले की, त्यांनी डिपॉझिट केलेले सर्व पैसे शबाब यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. दरम्यान, महेंद्र यांनी पैसे डिपॉझिट करण्यासाठी खाते क्रमांक लिहिताना शून्यच्या जागी ८ हा क्रमांक टाईप केला आणि चुकीच्या खात्यावर पैसे वळते झाले. बँक मॅनेजरने दावा केला की, महेंद्रसींगच्या तक्रारीनंतर आम्ही आदिलाबाद ब्रँचला १६ ऑगस्टला पत्र लिहून पैसे परत करण्याबाबतही सांगितले होते. 

दरम्यान, बँकेविरोधात महेंद्र मयनप्पायांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली खरी. पण, तिथेही ही मानवी चूक असून, त्यात बँकेचा कोणताही दोष नाही, असे सांगत मयनप्पाची याचिका निकाली काढली.

Read More