Marathi News> भारत
Advertisement

विश्वास ठेवा ! केवळ 61 पैसे प्रति लीटर मिळतंय पेट्रोल

भारतात पेट्रोल डिेझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळतेय. 

विश्वास ठेवा ! केवळ 61 पैसे प्रति लीटर मिळतंय पेट्रोल

नवी दिल्ली : भारतात पेट्रोल डिेझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळतेय. गेल्या महिन्यात पेट्रोलचा दर 6 रुपये प्रति लीटरने कमी झाला. पण जगातील असे अनेक देश आहेत जिथे पेट्रोलचे दर 6 रुपयांपेक्षाही कमी आहेत. आपल्याला याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. ग्लोबल पेट्रोल प्राइस डॉट कॉम (GlobalPetrolPrice.com) वर या देशांची नावं तुम्हाला दिसतील.  बेनेजुएलामध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत साधारण 61 पैसे तर सुडानमध्ये 9 रुपये 32 पैसे इतकी आहे.

ईराणमध्ये हिच किंमत 20.50 रुपये इतकी आहे. इथे आपल्या गरजेपेक्षा जास्त क्रूड उत्पादन केलं जात. त्यामुळे हा देश क्रूड चे निर्यात करतो.

पेट्रोल इतकं स्वस्त  

 कुवैतमध्ये एक लीटर पेट्रोल 24.82 रुपयांना मिळतयं. कुवैत देश देखील आपल्या गरजेपेक्षा जास्त क्रूड उत्पादन आणि निर्यात करतो.

अलजेरीयामध्ये एक लीटर पेट्रोल 25.54 तर इक्वाडोर मध्ये लीटरमागे 28.12 रुपये घेतले जातात. नायझेरियामध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 29.14 तर तुर्कमेनिस्तानमध्ये 30.74 रुपये आकारले जातात.

यापुढे मिस्त्रमध्ये एक लीटरमागे 30.74 रुपये तर आजरबाइजानमध्ये 33.75 रुपये दर आकारला जातो. 

Read More