अयोध्या : भगवान श्रीरामांच्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. बुधवारी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भूमिपूजन केल्यानंतर आता प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात झाली आहे. राममंदिर ट्रस्टने बुधवारी खाते क्रमांक आणि अन्य माहिती शेअर करुन दान करण्याचं आवाहन केलं आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी बुधवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ते म्हणाले की 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचे भूमिपूजन केले होते, आता मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. चंपत राय यांच्या मते, 'कोट्यावधी रामभक्तांना मंदिर बांधण्यात हातभार लावायचा आहे, त्यानंतर ट्रस्टच्या वतीने देणगी देण्यासाठी माहिती दिली जात आहे.'
श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या वतीने ट्विटमध्ये म्हटले की, 'जय श्री राम! भगवान श्री राम यांच्या पवित्र जन्मस्थळावर त्यांचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्याचे काम माननीय पंतप्रधानांकडून भूमिपूजनानंतर सुरू केले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिरातील बांधकामासाठी सर्व श्री राम भक्तांना जास्तीत जास्त शक्ती आणि शक्य तितक्या देणगी देण्यासाठी आवाहन करतो.
जय श्री राम!
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 12, 2020
प्रभु श्रीराम की पावन जन्मभूमि पर उनके भव्य और दिव्य मन्दिर के निर्माण का कार्य माननीय प्रधानमंत्री जी द्वारा भूमिपूजन पश्चात प्रारम्भ हो गया है।
श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र सभी श्रीराम भक्तों का आह्वान करता है कि मन्दिर निर्माण हेतु यथाशक्ति व यथासंभव दान करें। pic.twitter.com/Y7oTmuPOiL
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, केंद्र सरकारकडून हा ट्रस्ट तयार करण्यात आला. राम मंदिराशी संबंधित कामकाजाचा या ट्रस्टला अधिकार असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रस्टने भूमिपूजनासाठी आमंत्रण पाठवले होते, त्यानंतर पंतप्रधानांनी 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन केले.
श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र के बैंक खातों की जानकारी तथा दान करने की प्रक्रिया का विवरण निम्नानुसार है।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 12, 2020
Details of the bank accounts of Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra and various ways of donation are mentioned below.
जय श्री राम!
Jai Shri Ram! pic.twitter.com/6MrVfKMft4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आणि अन्य संत राम मंदिर भूमीपूजनाला उपस्थित होते. या दरम्यान, पीएम मोदी म्हणाले होते की, 'राम मंदिर देशात एकतेचा नवा धागा बनेल आणि इतिहास निर्माण होईल.'
श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र के बैंक खातों की जानकारी तथा दान करने की प्रक्रिया का विवरण निम्नानुसार है। pic.twitter.com/OguVLtvRSA
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 12, 2020