Marathi News> भारत
Advertisement

मूर्खपणा की स्टंट? दिवाळीच्या सफाईसाठी बाईंनी केला कहर, व्हिडीओ पाहून व्हाल Shock

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

मूर्खपणा की स्टंट? दिवाळीच्या सफाईसाठी बाईंनी केला कहर, व्हिडीओ पाहून व्हाल Shock

मुंबई : दिवाळी सण सुरु झाला आहे. त्या आधी लोकांनी घरं आणि ऑफिसमध्ये साफसफाई सुरू केली आहे. यामध्ये घर, दारे-खिडक्या, पंखे, जुन्या वस्तूंची साफसफाई करण्याबरोबरच त्यांना रंगवतात. सणाचा भाग म्हणून हा विधी दरवर्षी भारतीय कुटुंबांमध्येही सामान्य आहे. पण, काही लोक यामध्ये खूप पुढे जातात.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या अपार्टमेंटची खिडकी साफ करत आहे. हे तुम्हाला सामान्य वाटेल, पण हा एक अतिशय धोकादायक स्टंट आहे. कारण घर चौथ्या मजल्यावर आहे आणि महिला बाहेर लटकलेल्या खिडक्या साफ करत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या क्लिपमध्ये एक महिला तिच्या घराच्या खिडकीतून बाहेर पडताना दिसत आहे. ती काचेला कापडानं पुसताना दिसत आहे. आश्चर्य म्हणजे ती खिडकीच्या काठावर कोणत्याही आधाराशिवाय उभी आहे. ट्विटरवर ही क्लिप जवळपास 1.5 दशलक्ष वेळा पाहिली गेली आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटले की 'हे स्टंट तज्ञांनी केले आहेत, कृपया घरी करू नका.'

काहींसाठी हा व्हिडिओ खूपच मनोरंजक होता. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, 'खरं सांगायचे तर माझ्या हृदयाची धडधड थांबली आहे.' दुसर्‍या नेटकऱ्यानं लिहिलं की 'या महिलेनं तर खतरों के खिलाडीमध्ये भाग घ्यावा. खरंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर आजच व्हायरल झाला नाही तर फेब्रुवारीमध्ये सगळ्यात आधी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका सोसायटीतला असल्याचे म्हटले जाते. सोसायटीतील लोकांनी महिलेला स्वच्छता करताना पाहिल्यानंतर त्यांनी तिचा दरवाजा ठोठावला आणि तिला जीव धोक्यात घालू नका, असा सल्ला दिला.

Read More