Marathi News> भारत
Advertisement

जंगलात लाकूड तोडायला गेली, अन् करोडपती होऊन घरी परतली

लाकूडतोड्याची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल, इथं प्रत्यक्षातच घडलाय तसा चमत्कार. पाहा कसं पालटलं तिचं नशीब... 

जंगलात लाकूड तोडायला गेली, अन् करोडपती होऊन घरी परतली

मध्यप्रदेश : प्रत्येकालाच असं वाटत असतं की त्याला एखादी लॉटरी लागावी आणि त्याने करोडपती व्हावं. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत अशी घटना घडत नाही. काही क्वचित व्यक्तींच्या बाबतीत असे घडते. या घटनेतल्या महिलेसोबत अशीच घटना घडली आहे. जंगलात ती नेहमीप्रमाणे लाकूड गोळा करायला गेली.आणि लाकूड  गोळा करता करता ती करोडपती झाली. नेमकं असं तिला या जंगलात काय मिळालं आणि ती कशी करोडपती झालीय ते वाचूयात.  

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात आदिवासी महिला गेंदाबाई लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यावेळी त्यांना एक चमकदार दगड सापडला होता. हा दगड खुपच आकर्षक वाटत असल्याने त्यांनी घरी नेला. घरी जाऊन त्यांनी हा दगड पतीला दाखवला. मात्र पतीलाही तो चमकदार दगड ओळखता आला नाही. 

पती-पत्नी दोघांनाही हा चमकदार दगड ओळखता आला नसल्याने दोघांनी तो दगड हिऱ्याच्या एका कार्यालयात नेला. यावेळी त्यांना सापडलेला हा दगड हिरा असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना 4.39 कॅरेटचा सेंटचा अमूल्य हिरा सापडल्याची माहिती दिली. या हिऱ्याची अंदाजे किंमत 20 लाख रुपये आहे. सध्या हा हिरा बोलीसाठी ठेवण्यात आला आहे.हा हिरा मिळाल्याने आदिवासी कुटुंब अतिशय आनंदात आहे.

हिरा सापडल्याच्या प्रकरणावर गेंदाबाई म्हणाल्या, घरची परिस्थिती बेताची असल्याने लाकूड विकून मजुरी करून घराचा खर्च भागवतो असे त्या म्हणाल्या. कुटुंबात सध्या चार मुलगे आणि दोन मुली लग्नासाठी आहेत. आता हिरा विकून मिळणाऱ्या पैशातून आम्ही मुलींची लग्नं करू आणि घरही बांधू असे त्या म्हणतात. पत्नीला हिरा मिळाल्याने तो खूप आनंदी असल्याचे गेंदाबाईच्या पतीने सांगितले. 

Read More