Marathi News> भारत
Advertisement

याला म्हणतात मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतंय सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

याला म्हणतात मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतंय सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मित्रांनच महत्त्वाचं स्थान असतं. जेव्हा कोणता मित्र तुमच्या वाईट काळात तुमच्यासाठी धावून येतो तो खरा मित्र असतो. मित्र कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या पाठीशी उभा राहतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक मित्राची पोस्ट व्हायरल होतं आहे. एका महिलेनं तिच्या वडिलांच्या बेस्ट फ्रेंडबद्दल ही पोस्ट शेअर करत सांगितले आहे. नोकरीचा अर्ज लिहिण्यासाठी तिच्या वडिलांच्या मित्राने त्यांना कशी मदत केली हे तिनं सांगितलं. मैत्रीच्या या खऱ्या उदाहराणाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे.  

आणखी वाचा : 90 वर्षांची परंपरा जपण्यासाठी इथं गावकरी कपडेच घालत नाहीत

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट एअर इंडिया कमर्शियल लीड रवीना मोरेनं तिच्या लिंक्डइन अकाऊंटवरून शेअर केली आहे. 80 च्या दशकात तिच्या वडिलांच्या जिवलग मित्राने त्यांना नोकरी मिळविण्यात कशी मदत केली याबद्दल ही पोस्ट आहे. 'पुढील आठवड्यात या महिलेचे वडील निवृत्त होणार आहेत. हे पाहता , त्या महिलेनं तिच्या वडिलांना त्यांच्या सर्वात जवळचा विश्वासू असलेल्या मित्राची आठवण करून दिली. 1985 सालाचं हे पत्र हातानं लिहिलेलं आहे. या पत्रात नोकरीचा अर्ज देखील दिला आहे. हे पत्र शेअर करत 'जेव्हा माझे वडील 80 च्या दशकात पदवीधर झाले, तेव्हा कॅम्पस प्लेसमेंट ही काय साधारण गोष्ट नव्हती. ते आयुष्यात पहिल्यांदाच नोकरीसाठी अर्ज करत होते. रेझ्युमेचा कसा लिहायला हवा हे त्यांना कळत नव्हते. मात्र, त्यांचे जिवलग मित्र प्रकाश काका यांची इंग्रजी भाषा आणि हस्ताक्षर उत्कृष्ट होते. प्रकाश काका माझ्या वडिलांचे मदतगार ठरले, त्यांनी नोकरीचे 10 अर्ज लिहिण्यापासून माझ्या वडिलांना नोकरीसाठी तयार करण्यापर्यंत सगळी मदत केली. इतकंच काय तर मुलाखती दरम्यान, कोणती गोष्ट बोलायला हवी हे देखील त्यांनी त्या पत्रात सांगितले,' असे रवीना म्हणाल्या.

 आणखी वाचा : ब्रेकअपनंतर Depression येतंय? तर या 4 टिप्स करा फॉलो

fallbacks

पुढे रवीना म्हणाल्या, 'माझ्या वडिलांकडून नेहमीच चुका होत राहिल्या, उदाहरण म्हणजे एका कंपनीला पाठवणारा अर्ज दुसऱ्याच कंपनीला पाठवणं. पण एका चांगल्या मित्राप्रमाणे प्रकाश काका माझ्या वडिलांना सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन करत होते. वडिलांकडून चुकीच्या कंपनीकडे अर्ज पाठवण्यासारख्या चुका होत असल्या तरी प्रकाश काकांनी नोकरी मिळवून देण्यासाठी नेहमीच मदत केली.'

आणखी वाचा : अचानक प्रकृती बिघडल्यामुळं अभिनेत्री रातोरात रुग्णालयात दाखल; चेहऱ्याला सूज, आवाजही ओळखता येईना अशी अवस्था...

त्यानंतर रवीनानं हाताने लिहिलेला नोकरीसाठी अर्ज करण्याबाबत म्हणाली, 'प्रकाश काकांनी 1985 मध्ये माझ्या वडिलांना लिहिलेल्या अर्जांपैकी हा एक अर्ज आहे. तर हाताने लिहिलेला अर्ज ही खूप जूनी गोष्ट आहे. मित्राला नोकरी मिळण्यासाठी मदत करणार्‍या प्रत्येकाचे आभार मानते, जे मित्रांना काम मिळवूण देण्यासाठी खटाटोप करतात, रेझ्युमे तपासणं आणि त्याच्याच कोणत्या गोष्टी असायला हव्या ते सांगतात. ज्या कंपनीत ते नोकरीसाठी अप्लाय करत आहेत त्या विषयी माहिती देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कठीण काळात आपल्या मित्रासोबत राहतात.'

Read More