Marathi News> भारत
Advertisement

गळाभेट प्रसिद्धीसाठी नाही, ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या मुलीचे स्पष्टीकरण

मुरादाबाद येथे ईदच्या दिवशी एका तरुणीने १०० जणांना गळाभेट देत आलिंगन दिले होते. मात्र, यामागे कोणतीही चुकीची भावना नव्हती.

गळाभेट प्रसिद्धीसाठी नाही, ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या मुलीचे स्पष्टीकरण

मुरादाबाद : ईदच्या निमित्ताने तरुणांना भर रस्त्यात आलिंगन देणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. या मुलीचे नाव आलिशा मलिक असल्याचीही माहिती पुढे आली आहे. मात्र हा व्हिडिओ कसा आणि का व्हायरल झाला? हे ठाऊक नाही मी १०० मुलांना गळाभेट दिली त्यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा काहीही हेतू नव्हता. मी फक्त ईद निमित्त मुलांना शुभेच्छा देत होते. मात्र माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझ्या कुटुंबाला आणि मला खूप त्रास झाला, असेही आलिशाने म्हटलेय. याबाबत एएनआयने वृत्त दिलेय.

fallbacks

ईद निमित्ताने तरुणांना आलिंगन देणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तरुणी एका मॉलच्या बाहेर तरुणांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तरुणीला आलिंगन देता यासाठी अनेक तरुणांनी अक्षरक्ष: रांग लावली होती. तरुणीने जवळपास ५० तरुणांना गळाभेट घेतली.  तरुणी जवळपास १० मिनिटे सर्वांना मिठी मारत होती. रांगेत उभ्या सर्व तरुणांना कोणतीही चिडचिड आणि घाई न करता तरुणी सरळ मिठी मारत होती. यावेळी तिथे उपस्थित काही लोक व्हिडीओ शूट करत होते.  या व्हिडिओवरुन बरीच टीका झाल्यानंतर या मुलीने आपण प्रसिद्धीसाठी असे काहीही केले नसल्याचे म्हटलेय.

Read More